Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

फेरीवाल्यांचे महापालिकेसमोर आंदोलन

पिंपरी : फेरीवाला क्षेत्रात सोयीसुविधा द्याव्यात यासाठी मंगळवारी फेरीवाल्यांनी मंगळवारी महापालिका मुख्यालयासमोर आंदोलन केले. शहरातील फेरीवाले मोठ्या प्रमाणात या आंदोलनात सहभागी झाले. काशिनाथ नखाते, मारुती भापकर, राजू बिराजदार, इरफान चौधरी, अनिल बारवकर, किरण साडेकर आदी पदाधिकारी या आंदोलनात सहभागी झाले होते. शहरातील सर्वच फेरीवाल्यांना सामावून घेण्यासाठी, फेरीवाला कायद्याची अंमलबजावणी करण्याची गरज आहे. मात्र, पालिकेकडून त्याची अंमलबजावणी होत नाही. ज्या ठिकाणी हॉकर झोनची निर्मिती केली आहे. तिथे पाणी,वीज, स्वच्छता, व इतर सुविधा देण्यास प्रशासन टाळाटाळ करत आहे. असा आरोप या आंदोलकांनी केला.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...