Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

उद्या शहरात राष्ट्रीय कार्यशाळेचे उद्घाटन

उद्या शहरात राष्ट्रीय कार्यशाळेचे उद्घाटन पिंपरी : भारत सरकार आणि राज्य शासन यांच्या संयुक्त विद्यमाने 22 ते 24 सप्टेंबर 2022 या कालावधीत चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहामध्ये राष्ट्रीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यशाळेचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे. कार्यशाळेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील, ग्रामविकास व पंचायत राज मंत्री गिरीश महाजन, पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील, लोकप्रतिनिधी, केंद्र व राज्य शासनातील विविध विभागाचे वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी सहभागी होऊन मार्गदर्शन करणार आहेत. केंद्र शासनाने निश्चित केलेल्या 9 संकल्पनांपैकी ‘स्वच्छ व हरित ग्राम’ आणि ‘जल समृद्ध गाव’ या दोन संकल्पनांवर आधारित राष्ट्रीय कार्यशाळा घेण्याची जबाबदारी महाराष्ट्र राज्यावर सोपविण्यात आल्याने राज्यात शाश्वत विकास ध्येयाचे स्थानिकीकरण या विषयासंबंधीच्या दृष्टीकोनावर आधारित दोन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात येत आहे. या कार्यशाळेकरीता राज्यातून अंदाजे एक हजार तसेच इतर राज्ये व केंद्र शासित प्रदेशामधून जवळपास पाचशे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...