Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

पालिकेने गरीबांसाठी वैद्यकीय अर्थसहाय्य योजना सुरू करावी : आमदार जगताप यांची मागणी

पिंपरी : पिंपरी चिंचवड महापालिकेने पुणे महापालिकेच्या धर्तीवर शहरी गरीब वैद्यकीय सहाय्य योजना लवकरात लवकर सुरू करावी, अशी मागणी आमदार लक्ष्मण जगताप यांनी महापालिका आयुक्त शेखर सिंह यांच्याकडे केली आहे. यासंदर्भात आमदार लक्ष्मण जगताप यांनी आयुक्त शेखर सिंह यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पुणे महापालिका त्यांच्या हद्दीतील गोरगरीब व गरजू रुग्णांसाठी ’शहरी गरीब वैद्यकीय सहाय्य योजना राबवते. या योजनेअंतर्गत गरीब व गरजू नागरिकांना पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाशी संलग्न खासगी दवाखान्यांमध्ये सवलतीच्या दरात उपचार मिळतात. खासगी रुग्णालयात घेण्यात आलेल्या उपचारांसाठी महापालिकेकडून एक लाख रूपयापर्यंत आर्थिक मदत केली जाते. योजनेच्या लाभार्थ्यांना पुणे महापालिका कार्यक्षेत्रातील प्राधिकृत केलेल्या खासगी दवाखान्यांमध्ये आंतररुग्ण विभागातील केवळ जनरल वॉर्डमध्ये उपचार घेणार्‍यांनाच आर्थिक लाभ दिला जातो. निमसरकारी, खासगी व डिलक्स रूम घेणार्‍या रुग्णांना या योजनेचा लाभ मिळत नाही. या योजनेतील लाभार्थ्यांना मिळणार्‍या वैद्यकीय सुविधा आणि उपचार केंद्र सरकारच्या आरोग्य योजनेच्या (सीजीएचएस) दरपत्रकानुसार आर्थिक मदत दिली जाते. त्यासाठी लाभार्थ्याला महापालिकेतून उपचारासाठीच्या एकूण खर्चामध्ये 50 टक्के सवलत मिळविण्यासाठी हमीपत्र घ्यावे लागते. हे हमीपत्र घेऊन खासगी रुग्णालयात दिल्यानंतर एकूण रकमेच्या केवळ 50 टक्के रक्कम रुग्णाला भरावी लागते. उर्वरित 50 टक्के रक्कम (जास्तीत जास्त एक लाख रुपये) महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत संबंधित रुग्णालयाला अदा करण्यात येते. पुणे महापालिकेची शहरी गरीब वैद्यकीय सहाय्य योजना गरीब व गरजू रुग्णांसाठी अत्यंत चांगली आहे. या योजनेचा पिंपरी चिंचवड महापालिकेने परिपूर्ण वैद्यकीय सहाय्य योजना सुरू करावी.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...