पुणे : महाराष्ट्र गांधी स्मारक निधी आयोजित राष्ट्रपिता महात्मा गांधी सप्ताहाचा समारोप ७ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजता ज्येष्ठ पत्रकार संजय आवटे (संपादक,लोकमत ,पुणे ) यांच्या उपस्थितीत होणार आहे.महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे सचिव अन्वर राजन हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असतील.हा कार्यक्रम गांधीभवन(कोथरूड) येथे होईल.

