पिंपरी : मराठवाडा मुक्ती संग्राम अमृत महोत्सवी वर्षानिमित्त विजयादशमीच्या शुभ मुहुर्तावर पिंपरी चिंचवड पुणे महानगरातील मूळ मराठवाडा येथील रहिवाशी बंधुोभगिनींचा मराठवाडा दसरा स्नेह मेळावा बुधवार दि ५ ऑक्टोबर २०२२ रोजी पिरॅमिड हॉल, शाहुनगर येथे पार पडला.
भेटीगाठी, आपली माती; आपली माणसं या भूमिकेतून सर्वजण एकत्र जमले होते. मेळाव्याचे उद्घाटन महिलांच्या हस्ते दीपप्रज्वलन करुन आणि अमर जवान स्मारक प्रतिकृतीला मानवंदना देऊन करण्यात आले.
मराठवाडा भूमिपुत्र पिंपरी चिंचवड शहर यांच्या वतीने मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी तीन ठराव संमत करून घेण्यात आले पहिला ठराव शहिद भगतसिंग ,सुखदेव ,राजगुरु यांच्या बलिदान दिन २३ मार्च २०२३ रोजी आपल्या देशाची राजधानी नवी दिल्ली येथे देशभक्तीवर आधारीत मराठवाडा मुक्ती संग्राम अमृत महोत्सव कार्यक्रमाचे आयोजन करणे. दुसरा ठराव मराठवाडा मुक्ती संग्राम ७५ व्या वर्षा निमित्त १७ सप्टेंबर २०२३ रोजी बालेवाडी स्टेडियम पुणे येथे ७५ हजार नागरिकांच्या उपस्थितीत ध्वजारोहण करून मानवंदना देणे व देशभक्तीपर कार्यक्रमांनी मराठवाडा मुक्तीसंग्राम साजरा करणे आणि तिसरा ठराव पिंपरी चिंचवड महानगरात भव्य दिव्य सर्व सोयी सुविधायुक्त मराठवाडा भवन उभा करणे.
मराठवाडा मुक्ती संग्राम माहितीच्या प्रदर्शनाचे आयोजन पिरॅमिड हॉल मध्ये नितीन चिलवंत व जीवन बोराडे यांनी केले होते या मधुन मराठवाड्यावर ज्या हैद्राबाद संस्थानाच्या ७ निजामाची राज्य केलं होतं त्याची सविस्तर माहिती देण्यात आली होती, मराठवाडा मुक्ती संग्रामाचे ्प्रणेते स्वामी रामानंद तीर्थ ,गोंविदभाई श्रॉफ व स्वातंत्र्यसैनिकांचे फोटो लावण्यात आले होते. खर तर दसऱ्याच्या निमित्तान सोनं एकमेकांना देण्यात आले व आनंदान एकमेकांची विचारपुस करत होते. अशा पध्दतीन दसरा सण साजरा केला
या कार्यक्रमासाठी पिंपरी चिंचवड शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी उपस्थित होती या मध्ये माजी सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, उद्योजक अरुण पवार,व्यंकटराव शिंदे, गोरख भोरे,बाळासाहेब काकडे, नरेंन्द्र माने, गोपाळ माळेकर, प्रशांत जाधव, डी. एस. राठोड, अभिमन्यु पवार, प्रल्हाद लिपने,तुकाराम गोंगाणे, सुनील भोसले,जीवन बोराडे, नितीन चिलवंत,सतीश काळे,रामहारी केदार, मुंजाजी भोजने,मारुती बानेवार,शिवकूमार बायस, गणेश खरात,विजय घोडके,राजेंद्र गाडेकर,मनोज मोरे,प्रियंका बोराडे, रेश्मा चिलवंत, सुजाता पानपट,शिल्पा बोराडे,सारिका शिंदे, डॉ.प्रीती काळे,वैशाली बोराडे, गीतांजली बोराडे यांच्यासह अनेक जण उपस्थित होते.

