Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

पिंपरी चिंचवड : सेवा विकास बँकेच्या कर्मचा-यांचे आंदोलन

 


पिंपरी : एकेकाळी पिंपरी चिंचवड शहरातील नामांकित बँक म्हणून ओळखल्या जाणा-या दि सेवा विकास को-ऑपरेटिव्ह बँकेचा परवाना रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने रद्द केल्याने बँकेच्या सुमारे 300 कर्मचा-यांवर बेकारीचे संकट ओढावले आहे. या कर्मचा-यांनी शुक्रवारी बँकेच्या पिंपरी कॅम्पातील मुख्य शाखेसमोर आंदोलन केले.

 बचाव बचाव बँक बचाव’, ‘वाचवा रे वाचवा बँक वाचवा’, ‘300 कामगारांनी कोणाकडे जायचे’, ‘बँकेचे नुकसान करणाऱ्यांचा धिक्कार असो’, ‘बँकेचे वाटोळे करणाऱ्यांचा धिक्कार असो’ अशा जोरदार घोषणा कर्मचाऱ्यांनी दिल्या.

1971 च्या सुमारास सिंधी समाजातील लोकांनी एकत्र येवून बँकेची स्थापना केली होतीकालांतराने बँकेच्या 25 शाखा सुरु झाल्यात्यानंतर कोट्यवधींची बोगस कर्जे मंजूर करण्यात आलीया गैरप्रकाराची चौकशी झाल्यानंतर 124 प्रकरणात 400 कोटीहून अधिक रुपयांचे कर्जवाटप नियमबाह्य पद्धतीने झाल्याचे निष्पन्न झालेयाप्रकरणी गुन्हेही दाखल झालेबँकेवर प्रशासक नेमण्यात आलात्याने परिस्थिती सावरण्याचा आटोकाट प्रयत्न करूनही यश आले नाही. त्यामुळे  रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने बँकेचा परवाना रद्द केला.


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...