Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

माजी राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांनी देशासाठी केलेले महान कार्य सर्वाना कायम प्रेरणा देत राहील : आमदार महेश लांडगे

 


पिंपरी  :  भारताचे माजी राष्ट्रपती, थोर शास्त्रज्ञ भारतरत्न डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांनी अत्त्याधुनिक संशोधन प्रणालीचा वापर देशाच्या संरक्षण सज्जतेत करून भारताचे स्थान जागतिक महासत्तांमध्ये बळकट केले. त्यांचे देशासाठी केलेले महान कार्य सर्वाना कायम प्रेरणा देत राहील असे प्रतिपादन भोसरी विधानसभेचे आमदार महेश लांडगे यांनी केले. 

       माजी राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय भवनातील प्रतिमेस आमदार महेश लांडगे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले त्यावेळी आमदार लांडगे बोलत होते. डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचा जन्म दिवस “वाचन प्रेरणा दिन” म्हणून देखील साजरा केला जातो.

       या कार्यक्रमास महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, जितेंद्र वाघ, उल्हास जगताप, उप आयुक्त संदीप खोत, विशेष अधिकारी किरण गायकवाड, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी ओमप्रकाश बहिवाल, सुरक्षा अधिकारी प्रमोद निकम, शिक्षण मंडळाचे माजी सभापती अर्जुन ठाकरे, जनसंपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक, वसिम कुरेशी तसेच विविध विभागातील कर्मचारी व नागरिक उपस्थित होते.

      आमदार महेश लांडगे म्हणाले डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या जीवनाची सुरूवात अतिशय खडतर झाली. त्यावर त्यांनी मोठ्या जिद्दीने मात करून विज्ञान शाखेची पदवी संपादन केली. त्यानंतर शास्त्रज्ञ म्हणून तसेच नंतर संचालक पदावर संरक्षण दलात ते सहभागी झाले. त्यांच्या कारकीर्दीत त्रिशूल, पृथ्वी, अग्नी अशा अग्निबाणांची तसेच अर्जुन सारख्या अत्त्याधुनिक रणगाड्यांची निर्मिती झाली. डॉ.कलाम यांनी माजी पंतप्रधानांचे मुख्य वैज्ञानिक सल्लागार म्हणून देखील काम पाहिले. त्यानंतर त्यांनी राष्ट्रपती पदावर विराजमान होवून देशाला बलशाली बनविण्यासाठी तिन्ही संरक्षण दलांच्या मजबुतीकरणासाठी कार्यांना दिशा दिली. त्यांना भारतरत्नपद्मविभूषण, पद्मभूषण, इंदिरा गांधी राष्ट्रीय एकात्मता पुरस्कार असे अनेक पुरस्कार देखील मिळाले असे सांगून डॉ.ए.पी.जे.अब्दुल यांच्या प्रखर देशभक्तीचा वारसा सर्वानी जोपासावा असेही आमदार लांडगे म्हणाले.

यावेळी वाचन प्रेरणा दिनानिमित्त माजी राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या जीवनावर आधारित अग्निपंख या पुस्तकाचे आमदार महेश लांडगे यांच्या हस्ते उपस्थितांना वाटप करण्यात आले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रफुल्ल पुराणिक यांनी केले.


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...