करवा चौथ आणि धनत्रयोदशीसाठी खास स्टोअर्स
गुरुग्राम : भारतातील आघाडीचा ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म, असललेल्या स्नॅपडीलने आज, सणासुदीच्या दिवसात ग्राहकांना मनपसंत वस्तुंची खरेदी एकाच ठिकाणी करता यावी म्हणून स्पेशल थीम स्टोअरची मालिका सुरू करण्याची घोषणा केली.
ग्राहकांनी मागील वर्षात खरेदी केलेल्या वस्तुंच्या निकषावर आणि विशिष्ट सणांच्या कालावधीत ग्राहकांनी खरेदी केलेली उत्पादने विचारात घेऊन ई-स्टोअर तयार करण्यात आले आहेत. उदाहरणार्थ, वापरकर्ते या वस्तू स्वतंत्रपणे शोधण्याऐवजी पूर्ण “करवा चौथ थाली सेट” (स्टील थाळी, मेंदी मेहंदी, पूजा पुस्तक, सिंदूर इ.) खरेदी करू शकतात किंवा भेट देऊ शकतात. बर्याच वेळा ग्राहकांना विशिष्ट विधींसाठी आवश्यक असलेल्या संपूर्ण वस्तूंची माहिती नसते. त्यामुळे खरेदी करताना त्यांची अडचण होते. ती या थीम स्टोअरमुळे दूर होणार आहे. याबाबत बोलताना स्नॅपडीलच्या प्रवक्त्याने सांगितले की, “अशा थीम-स्टोअर्समध्ये आमची भूमिका पारंपारिक ज्ञान सामायिक करणाऱ्या कुटुंबातील अनुभवी सदस्यासारखी आहे.
स्नॅपडीलच्या ई-स्टोअरमध्ये हे समाविष्ट आहे:
करवा चौथ स्टोअर - या स्टोअरमध्ये सरगी वस्तू (ड्रायफ्रुट्स आणि मिठाईचे बॉक्स), करवा चौथ थाळी (स्टील प्लेट आणि पॉट सेट, दिया, पूजेसाठी आवश्यक वस्तू), मनोरंजन सेट (तांबोळा सेट आणि पत्ते खेळ) असे विविध पर्याय उपलब्ध असतील. दिवसभरासाठी सर्व ट्रेंडी फॅशन पोशाख आणि बांगड्या, मेकअप सेट यांचा समावेश असेल. या स्टोअरमध्ये रंगिता, ज्युनिपर आणि जनस्या यांसारख्या पारंपारीक फॅशन ब्रँड्ससह मियुकी आणि अरागमा सारख्या ब्रँड्सकडून विशेष ऑफर असतील. 13 ऑक्टोबर, गुरुवारी करवा चौथ साजरा केला जाणार आहे.
धनत्रयोदशी स्टोअर - धनत्रयोदशीसाठी समर्पित ई-स्टोअरमध्ये स्टीलची भांडी, पितळ आणि तांब्याची भांडी, पूजा साहित्य (देवाच्या मूर्ती, पितळेचे दीप इ.) आणि पडदे, कुशन, टेबल मॅट्स इत्यादी घराच्या सजावटीच्या वस्तू उपलब्ध असतील. सोने आणि चांदीची नाणी आणि स्टर्लिंग चांदीचे दागिने देखील आहेत. भांडी, सोने आणि चांदी खरेदी करण्यासाठी धनत्रयोदशीचा सण हा शुभ दिवस मानला जातो आणि यामध्ये होम, किचन आणि अप्लायन्सेस श्रेणीमध्ये विस्तृत ऑफर आणि सवलती असतील, ज्यात होम-फोकस्ड ब्रँड, होमटेल्स कडून विशेष ऑफर असतील. हिंदू कॅलेंडरनुसार यावर्षी 22 ऑक्टोबर आणि 23 ऑक्टोबरला धनत्रयोदशी साजरी केली जाणार आहे.
स्नॅपडील गिफ्टिंग स्टोअर - सध्या सुरू असलेल्या गिफ्टिंग स्टोअर सीझनमधील सर्वात लोकप्रिय आणि भेटवस्तू असलेल्या वस्तू जसे की काचेच्या वस्तू, डिनर सेट आणि बार अॅक्सेसरीज ते बेडशीट सेट सारख्या होम फर्निशिंग आयटम्सपासून ते स्मार्ट घड्याळे, इअरफोन्स, सेल्फी स्टिक्स यासारख्या इलेक्ट्रॉनिक वस्तुंचा यात समावेश आहे या वस्तू 249 रुपयांपासून उपलब्पाध असणार आहेत.ग्राहक होमटेल, मियुकी, एन-बॉक्स इत्यादी ब्रँड्समधील अनेक वस्तूंमधून निवड करू शकतात. स्टोअरमध्ये ग्राहकांच्या भेटवस्तूंच्या सर्व गरजा एकाच ठिकाणी पूर्पूण केल्र्णया जातील. याशिवाय ग्राहकांना तनिष्क, कॅरेटलेन, क्लियरट्रिप, मेकमायट्रिप, स्विगी, लाइफस्टाइल ऑनलाइन, केएफसी, डोमिनोस पिझ्झा आणि इतर बर्याच लोकप्रिय गिफ्ट कार्ड्सवरील ऑफर्स उपलब्ध आहेत.
स्नॅपडीलचा तुफानी सेल - यामध्ये ग्राहक सणासुदीच्या मोसमातील ऑफरचा उपयोग सुगंध आणि डिफ्युझर्स, विंड चाइम्स, फोटो फ्रेम्स, टेबल मॅट्स, डेकोरेटिव्ह मिरर, बार सेट्स, ग्लास सर्व्ह वेअर, ब्लो टॉर्च आणि स्प्राउट मेकर यासारख्या आकर्षक खरेदीसाठी करत आहेत.
ग्राहकांची खरेदी अधिक सुलभ होण्यसाठी स्नॅपडीलने विशेष यंत्रणा उभारली आहे.
स्नॅपडीलने अलीकडेच बँक ऑफ बडोदा आणि जीसीबीेसह को-ब्रँडेड रुपे कार्ड सादर केले असून स्नॅपडीलवर केलेल्या खरेदीवर अमर्यादित ५ टक्के कॅशबॅक ऑफर आहे.


