Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

’शहर विकास नागरिक केंद्री हवा ' : चर्चासत्राचा सूर

  


पुणे : शहर विकासाशी निगडित मुद्द्यांवर  निगडित सर्व घटकांशी चर्चा करण्यासाठी 'गोल्डन डायलॉग्स' या संवादमालेचे उद्घाटन  १४ ऑक्टोबर रोजी , शुक्रवारी सायंकाळी झाले. 'शहर विकास  नागरिक केंद्री हवा ' असा   सूर या संवादमालेतील पहिल्या चर्चासत्रात उमटला.

ज्येष्ठ आर्किटेक्ट  विश्वास कुलकर्णी यांनी स्थापन केलेल्या व्ही. के. ग्रुप या प्रसिद्ध  आर्किटेक्चर कंपनीच्या सुवर्णमहोत्सवानिमित्त ही संवादमाला आयोजित करण्यात आली आहे.

'गोल्डन डायलॉग्स'   संवादमाले मधील पहिले सत्र  'रोल ऑफ प्लेसमेकिंग इन अर्बन रिव्हायटलायजेशन'  या विषयावर  शुक्रवार,१४ ऑक्टोबर २०२२ रोजी सायं ५. ३० वाजता नवलमल फिरोदिया ऑडिटोरियम, भांडारकर ओरिएंटल रिसर्च इन्स्टिटयूट(विधी महाविद्यालय रस्ता, पुणे )येथे पार पडले.

  या  संवादमालेतील पाहिल्या चर्चासत्रामध्ये  पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनचे   चीफ नॉलेज ऑफीसर    अनिरुध्द शहापुरे ,  'व्हीके यु अर्बन' चे  विजय साने, 'अर्बन ट्री'चे  नकुल रेगे, 'स्टुडिओ इनफील' चे  रोहित गादिया या  तज्ज्ञांनी  मते मांडली . 'वाइल्ड अँगल फोरम'च्या प्रिया गोखले यांनी चर्चासत्राचे संचालन केले. वैपयन चक्रवर्ती यांनी  स्वागत केले.डॉ.पूर्वा केसकर यांनी प्रास्ताविक केले. ज्येष्ठ आर्किटेक्ट विश्वास कुलकर्णी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.


 'आर्किटेक्ट, इंजिनिअर्स, सर्व्हेयर्स  असोसिएशन', 'इन्स्टिटयूट ऑफ अर्बन डिझायनर्स इंडिया' आणि 'वाइल्ड अँगल फोरम' या संस्थेच्या सहकार्याने ही  संवादमाला होत आहे.  संवादमाला  सर्वांसाठी विनामूल्य व खुली आहे.


अध्यक्षस्थानावरून बोलताना अनिरुद्ध शहापुरे म्हणाले, ' शहरात नव्या सार्वजनिक जागा विकसित करताना सर्वसमावेशक, सर्वंकष दृष्टीकोण ठेवला पाहिजे. नागरी जीवनावर विधायक परिणाम कसा होईल, याचा विचार केला पाहिजे. शहरी जीवनाला नेमके काय हवे आहे, हे लक्षात घेतले पाहिजे. प्रत्येक शहराच्या गरजा वेगळया असत्या, प्रत्येक शहरात स्वतंत्र दृष्टीकोण ठेऊन नियोजन करावे लागते. पुण्याला आता पार्किंगचे नियोजन केले पाहिजे.आर्किटेक्ट मंडळींनी त्यासाठी नव्या कल्पना घेऊन पुढे यावे.आर्किटेक्ट हे सर्वंकष विकास प्रक्रियेचे प्रवक्ते व्हावेत ' .

आर्किटेक्ट अनिता खांडेकर म्हणाल्या, ' शहरातील नागरिकांना वावरण्यासाठी, संवाद साधण्यासाठी, काम करण्यासाठी, विरंगुळयासाठी मोकळया जागा असल्या पाहिजे. या नागरी पुनरुज्जीवनाच्या  प्रक्रियेत ' प्लेसमेकिंग 'तंत्राचे महत्व आहे. पुणे स्मार्ट सिटी संकल्पना प्रत्यक्षात येण्यात अनेक आव्हाने आहेत. चांगली धोरणे , निधी आणि प्रशासकीय निर्णय आवश्यक आहेत '.

विजय साने म्हणाले, ''प्लेसमेकिंग ' तंत्राने सार्वजनिक जागा अधिक संख्येने आणि चांगल्या  निर्माण करता आल्या पाहिजे. त्या आपल्या मनाला भावणाऱ्या असल्या पाहिजेत. तेथे सहज पोहोचता येईल, अशा असाव्यात.भारतात आव्हाने जास्त आहेत. सर्वांच्या साठी उपयुक्त गोष्टींना प्राधान्य देता आले पाहिजे. संबंधित सर्व घटकांचे मत विचारात घेतले पाहिजे. नागरिकांना केंद्रस्थानी ठेवून हे नियोजन केले पाहिजे.

 रोहित गादिया म्हणाले,' सार्वजनिक ठिकाणे निर्माण करताना स्वच्छता, बसण्याची जागा, प्रकाश अशा मूलभूत गोष्टींची काळजी घेतली पाहिजे.

नकुल रेगे म्हणाले, ' सार्वजनिक जागांना नवे रुप देताना कल्पकता वापरली पाहिजे. सार्वजनिक जागांचा, शहरातील प्रसिद्ध ठिकाणांचे संवर्धन करण्याने शहराच्या प्रगतीत भर पडते '.

शहर नियोजन आणि सार्वजनिक जागा आकर्षक करण्याविषयी सादरीकरणे या कार्यक्रमात करण्यात आली.

शाश्वत शहर विकासासाठी संवाद

 पुणेकरांना  भेडसावणाऱ्या शहरी समस्या, पर्यावरणविषयक जागरूकता, शाश्वत शहर विकास,  शहरी जीवनाची गुणवत्ता  अशा गोष्टींवर ऊहापोह करण्यासाठी या क्षेत्रातील राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय तज्ज्ञ, सरकारी अधिकारी, स्थापत्यशास्त्राचे  विद्यार्थी, नागरिक, इंजिनिअर्स, वास्तुविशारद, स्टेकहोल्डर्स यांना या संवादमालेत आमंत्रित करण्यात येणार आहे. या संवाद मालिकेची येत्या वर्षभरात पाच सत्रे नियोजित करण्यात आली आहेत.ज्यामध्ये 'रोल ऑफ प्लेसमेकिंग इन अर्बन रिव्हायटलायजेशन, पुणे शहरासाठी हवामान कृती आराखडा, डिझाइन स्पर्धेची भूमिका, शहरी इमारतीमध्ये रेटिंग सिस्टीमचे महत्व, पर्यावरणीय लँडस्केपिंग आणि शाश्वत शहरीकरण  यासारख्या शहर विकासाशी निगडित विविध  विषयांवर तज्ञांसोबत  चर्चा केली जाईल. 

सुवर्णमहोत्सवानिमित्त पुढाकार

  आर्किटेक्ट  विश्वास कुलकर्णी यांनी  १९७३ साली सुरु केलेली ही आर्किटेक्चर प्रॅक्टिस आता  जवळपास २५० लोकांचे कुटुंब बनली आहे. झपाट्याने वाढणाऱ्या पुणे शहराचा प्रवास विश्वास कुलकर्णी यांनी अगदी जवळून पाहिलेला आहे. व्यवसाय कायमच चोख आणि प्रामाणिकपणे करण्याबरोबर त्यांनी समाजोपयोगी काम करण्यावर  भर दिलेला आहे. पुण्यातील या सर्वात जुन्या आणि मोठ्या कंपनीचा  पुणे शहराच्या विकासात मोलाचं वाटा आहे. फक्त आर्किटेक्चर प्रॅक्टिस पासून सुरु झालेली ही फर्म आज  शहर नियोजन, पर्यावरण, ग्रीन बिल्डींग्स, इंटेरिअर डिझाइन अशा विविध क्षेत्रात अग्रेसर  आहे. पुणे शहरातील दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर,जिल्हा परिषदेची नवी प्रशासकीय इमारत,परमार ट्रेड सेंटर अशा १ हजाराहून अधिक इमारतीचे आरेखन या कंपनीने केले आहे. ग्रीन होम्स प्लॅटिनम प्रमाणन व्ही के ग्रुप कडून केले जाते.विश्वास कुलकर्णी यांना त्यांच्या योगदानाबद्दल ग्लोबल रिअल इस्टेट काँग्रेसने 'टॉपमोस्ट आर्किटेक्चर लीडर्स' पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.  

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...