Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

मनोरंजन : ‘तू फक्त हो म्हण’ चित्रपट १४ ऑक्टोबरला चित्रपटगृहात

 


प्रेम हे आयुष्याच्या वाटेवरचे वळण असते. त्यात काही जण यशस्वी होतात तर काहींना अपयश येते. प्रेमविवाह  केल्यानंतर आजही कित्येक प्रेमवीरांना निंदनीय वागणुकीचा अनुभव येतो. आता काळ बदलला असला तरी काही प्रवृत्तींमुळे प्रेमविवाह करणाऱ्यांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलेला नाही हेच सांगत... प्रेमाची अनाहूत जाणीव झालेल्या प्रेमवीरांची कथा उलगडून दाखवणाऱ्या तू फक्त हो म्हण’ या चित्रपटाचा ट्रेलर आणि म्युझिक अनावरण सोहळा  नुकताच संपन्न झाला. एन एच स्टुडिओची प्रस्तुती असलेल्या या चित्रपटातून मोनालीसा बागल आणि निखिल वैरागर ही जोडी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. येत्या १४ ऑक्टोबरला तू फक्त हो म्हण सर्वत्र प्रदर्शित होत आहे.

याप्रसंगी बोलताना मोनालीसा आणि निखिल सांगतात की, आमच्यात आधीपासून छान मैत्री होती त्यामुळे या चित्रपटात काम करणं आम्ही एन्जॉय केलं. प्रेमकथेच्या माध्यमातून काही सांगण्याचा प्रयत्न दिग्दर्शकांनी केला आहे. प्रत्येकाने हे सांगण समजून घ्यायला हवं असही या दोघांनी सांगितल. चित्रपट खूप छान झाला असून प्रत्येकाने आवर्जून हा चित्रपट पहावा असं दिग्दर्शक डॉ.गणेशकुमार पाटील, भास्कर डाबेराव आणि निर्माते किरण बळीराम चव्हाण, डॉ.गणेशकुमार पाटील यांनी सांगितले. या चित्रपटाला शुभेच्छा देत मी या चित्रपटासाठी गायलेलं गाणं प्रेक्षकांना आवडेल असा विश्वास गायक आनंद शिंदे यांनी व्यक्त केला.

प्रेमासाठी त्यागसंघर्ष आणि काहीही करायची तयारी असणाऱ्या या प्रेमवीरांच्या आयुष्यात घडणाऱ्या घटनांनंतर त्यांच प्रेम कोणतं वळण घेते?  हे वळण त्यांना एकत्र आणणार की वेगळं करणारयासोबत प्रेमाकडे बघण्याचा समाजाचा दृष्टिकोन तू फक्त हो म्हण या चित्रपटात मांडण्यात आला आहे. संगीतमय प्रेमकथा असलेल्या तू फक्त हो म्हण या चित्रपटाचे दिग्दर्शन डॉ.गणेशकुमार पाटील आणि भास्कर डाबेराव यांनी केले आहे. चित्रपटाची निर्मीती किरण बळीराम चव्हाण आणि डॉ.गणेशकुमार पाटील यांची आहे. नरेंद्र हिरावत आणि श्रेयांश हिरावत हे चित्रपटाचे प्रस्तुतकर्ते आहेत.

मोनालीसा बागलनिखिल वैरागर या जोडीसोबतच नाळ’ व झुंड’ चित्रपटानंतर गणेश देशमुख हे एका वेगळया भूमिकेत तू फक्त हो म्हण’ मध्ये दिसणार आहेत. सोबत माजी आमदार तुकाराम बीडकरसविता हांडेपुष्पा चौधरीडॉ.गणेशकुमार पाटीलजोया खानआकाश ठाकरेरविशंकर शर्माभाविका निकमराम पारस्करयोगिनी सोळंकेपरमेश्वर गुट्टे आदि कलाकारांच्या भूमिका आहेत. अभिनेत्री मानसी नाईक या चित्रपटात पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसणार आहे.

तू फक्त हो म्हण चित्रपटाची कथा भास्कर डाबेराव तर पटकथा संवाद सचिन जाधव यांचे आहेत. सुरेखा गावंडेभास्कर डाबेरावस्वप्नील जाधव यांनी गीते लिहिली आहेत. आनंद शिंदेअवधूत गुप्तेआर्या आंबेकरजय बोरापूजा पाटील यांचा स्वरसाज चित्रपटातील गाण्यांना लाभला आहे. दिग्दर्शनाची बाजू सांभाळतानाच भास्कर डाबेराव यांनी सुमधुर संगीत चित्रपटाच्या गीतांना दिले आहे. आदित्य बेडेकर यांचे पार्श्वसंगीत चित्रपटाला लाभले आहे. कार्यकारी निर्माते रविशंकर शर्मा व राहुल चव्हाण हे आहेत. छायांकन मधुरम जे सोलंकी तर संकलन आनंद ए.सिंग यांचे आहे. रंगभूषा समीर कदमवेशभूषा अमृता पाटीलअंजली भालेरावअस्मिता राठोडअभिजीत ठाकूर यांची असून कलादिग्दर्शन गणेश पाटोळे यांचे आहे. नृत्यदिग्दर्शक गणेश पतंगेपंकज बोरे आहेत. तर साऊंड डिझाईन दिनेश उचिल व शंतनू अकेरकर यांनी केले आहे तर मार्केटिंग हेडची जबाबदारी श्रद्धा हिरावत यांनी सांभाळली आहे.

१४ ऑक्टोबरला तू फक्त हो म्हण सर्वत्र प्रदर्शित होत आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...