Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

मनोरंजन : घरबसल्या 'क्यू मराठी'वर नाटकांची मेजवानी !एकांकिका अनेक, स्थळ मात्र एक

 


पुणे :  एकांकिका स्पर्धा म्हटलं म्हणजे डोळ्यासमोरयेतो तो जल्लोष, उत्साह आणि नव्या दमाच्या लेखकांचीसंहिता रंगमंचावर यथार्थपणे साकारण्याची सर्व विभागातून होणारी कमालीची चुरस.यातून प्रेक्षकाला एका अनोख्या प्रयोगाचा आस्वाद घेता येतो. अलिकडेच क्यू मराठीवाहिनीने 'क्यू मराठी युथफुल महाकरंडक' राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेचे आयोजन केले होते, त्यालासंपूर्ण महाराष्ट्रातून प्रचंड प्रतिसाद मिळाला.  या एकांकिकास्पर्धेची प्राथमिक फेरी मुंबई,नवी मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक आणि औरंगाबाद या विभागात घेण्यात आली. या प्रत्येकविभागातुन स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. स्पर्धेचा प्रतिसाद पाहता काहीविभागावर स्पर्धा दोन दिवस करावी लागली. याच प्राथमिक फेरीमधून अंतिम फेरी साठी एकूण२५ एकांकिका निवडल्या गेल्या. याच निवडलेल्या दर्जेदार अशा २५ एकांकिकामुंबईत रंगशारदा सभागृह, वांद्रे, पश्चिमयेथे ३ ऑक्टोबर ते ६ ऑक्टोबर दरम्यान सकाळी ९ ते रात्री ९ या वेळात सादर होत आहेत.सदर एकांकिकांनापरीक्षक म्हणून दिग्गज नाट्य-सिनेअभिनेते डॉ.गिरीश ओक, नाट्यदिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णीआणि प्रसिद्ध नाट्य-सिने अभिनेत्री अदिती सारंगधर लाभले आहेत.   रंगमंचावर नाटक पाहणे हा एकवेगळा आणि अद्भुत अनुभव असतो. मोठ्या शहरात प्रेक्षकांना असे नाट्य-प्रयोगपाहण्याची संधी मिळते परंतु महाराष्ट्रातील सगळयाच प्रेक्षकांना ही प्रत्यक्षप्रयोग पाहण्याची संधी मिळत नाही. अशा प्रेक्षकांसाठी क्यूमराठी वाहिनीच्या वाहिनीप्रमुख नीता ठाकरे आणि प्रोग्रामिंग प्रमुखनिनाद सोनावणे यांनी आता हा नाटकांचा खजिनामहाराष्ट्रातील सर्व प्रेक्षकांना मोफत पाहता यावा यासाठी याचे प्रक्षेपण क्यूमराठी वाहिनीवर करण्याचे ठरवले त्यामुळेच आता महाराष्ट्रातील सर्वच प्रेक्षकांनाघरबसल्या दर्जेदार नाटकांचे प्रयोग ७ ऑक्टोबर पासून रोज सायं ७.३० वाजता पहायलामिळणार आहे. 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...