Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

वेदांत-फॉक्सकॉन’ प्रकल्प गुजरातला नेल्याच्या निषेधार्थ शिवसेनेचे आंदोलन

पिंपरी : वेदांत-फॉक्सकॉन’ प्रकल्प गुजरातला नेल्याच्या निषेधार्थ शिवसेनेचे सोमवारी पिंपरी येथे आंदोलन केले. शिवसेनेचे शहरप्रमुख अ‍ॅड. सचिन भोसले यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. यावेळी शिवसैनिकांनी ‘खोके सरकारचा धिक्कार असो’ ‘महाराष्ट्राचा रोजगार पळवणार्‍या शिंदे सरकारचा धिक्कार असो’ अशी घोषणाबाजी केली. आंदोलनात माजी आमदार गौतम चाबुकस्वार, शहर महिला संघटिका अ‍ॅड. उर्मिला काळभोर, संघटक गोविंद गोळवे, कामिनी मिश्रा, रेखा दर्शिले, धनंजय आल्हाट, वैशाली मराठे, सचिन सानप, पांडुरंग पाटील, यांच्यासह शिवसैनिक सहभागी झाले होते. यावेळी बोलताना शहरप्रमुख अ‍ॅड. सचिन भोसले यांनी शिंदे गटात गेलेल्या 40 आमदार आणि 12 खासदारांना पुन्हा गुजरातला न्या. मात्र, महाराष्ट्रातील प्रकल्प गुजरातला नेऊ नका, असे आवाहन करत मोदी सरकारला आणि शिंदे-फडणवीस सरकारला महाराष्ट्रातील जनता मतपेटीतून धडा शिकवेल, अशी टीका केली. माजी आमदार गौतम चाबुकस्वार म्हणाले, फोडा आणि राज्य करा अशी ब्रिटिशांप्रमाणे भाजपची रणनीती आहे. त्याविरोधात शिवसैनिक एकजुटीने लढा देतील. तर अ‍ॅड. उर्मिला काळभोर म्हणाल्या की, बाळासाहेबांचा सच्चा शिवसैनिक रोजगार पळवणार्‍या भाजपला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. अ‍ॅड. सचिन भोसले यांनी सांगितले की, तळेगाव एमआयडीसीमध्ये जेथे हा प्रकल्प होणार होता, तेथे लवकरच युवासेनेचे प्रमुख, माजी मंत्री आदित्य ठाकरे हे आंदोलन करणार आहेत. या आंदोलनात शिवसैनिक मोठ्या संख्येने सहभागी होतील.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...