डेंग्यूमुळे तरुणाचा मृत्यू
9/21/2022 10:26:00 PM
0
डेंग्यूमुळे तरुणाचा मृत्यू
पिंपरी : समतानगर, नवी सांगवी येथील रोहित भोर या तरुणाचा औंध येथील एम्स हॉस्पिटलमध्ये डेंग्यूमुळेमृत्यू झाला. गेले बारा दिवस त्याच्यावर उपचार सुरू होते. त्याचे वडील चिमणराव भोर यांचा ही गेल्या वर्षी कोरोनामुळे मृत्यू झाला. रोहितचा लहान भाऊ विनीत भोर याने सांगितले की, समतानगर गल्ली नंबर दोनच्या पाठीमागे ढोरे फार्म हाऊसच्याजवळच एका खाजगी बांधकाम व्यवसायिकाने बांधकाम चालू केले आहे, त्या खाजगी जागेत पाण्याचे डबके तयार झाले आहे,तेथे गवतही मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे. त्यात डासांची उत्पत्ती होत आहे, याचा त्रास सी.एम.ई. कॉलनीतील व समतानगरमधील नागरिकांना होत आहे. याचा पालिकेने गांभीर्याने विचार करावा.


