कोथरुडमध्ये होणार महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा
9/14/2022 09:55:00 PM
0
पुणे : कोथरूडमध्ये वर्षाच्या अखेरीस महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा होणार आहे.900 कुस्तीगीर या स्पर्धेत सहभागी होतील.डिसेंबरमध्ये ही स्पर्धा होणार आहे अशी माहिती माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली.
33 जिल्ह्यातील 11 महापालिकांमध्ये 45 तालीम संघातील 900 मल्ल स्पर्धेत होणार सहभागी होणार आहेत.नामांकित 40 मल्ल सुद्धा घेणार या स्पर्धेत भाग घेणार आहेत.स्पर्धेचे आयोजन संस्कृती प्रतिष्ठान करणार असून डिसेंबर महिन्यातील 6 दिवस ही स्पर्धा होणार आहे. यंदा महाराष्ट्र कुस्ती स्पर्धेचा मान पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या संस्कृती प्रतिष्ठानला मिळाला आहे.
महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या अस्थायी समितीचे अध्यक्ष संजय सिंग यांच्याकडून महाराष्ट्र केसरी स्पर्धा आयोजनाचे पत्र मुरलीधर मोहोळ यांनी स्विकारले आहे. स्व. मामासाहेब मोहोळ यांच्या संकल्पनेतून आणि दूरदर्शी विचारातून ‘महाराष्ट्र केसरी’ ही स्पर्धा सुरु झाली आणि आज मोठ्या शिखरावर पोहोचली. आम्हा मोहोळ कुटुंबियांकडे या स्पर्धेची जबाबदारी आली, ही निखळ समाधान देणारी बाब आहे अशी भावना मोहोळ यांनी व्यक्त केली आहे

