आयुक्तांच्या आदेशाने विभागप्रमुखांची अडचण
9/14/2022 09:56:00 PM
0
पिंपरी : पिंपरी चिंचवड महापालिकेचे नवे आयुक्त शेखर सिंह यांनी पालिकेतील बेशिस्त कारभाराला शिस्तीत आणण्यास प्राधान्य दिले आहे. त्यामुळे आता पालिकेतील कारभार वाटेल तसा हाकणा-या अनेक अधिका-यांची पंचाईत झाली आहे. आयुक्तांनी काढलेल्या एका आदेशामुळे आता पालिकेतील विभागप्रमुखांची चांगलीच अडचण झाली आहे. आयुक्तांकडे मंजुरीसाठी पाठविल्या जाणाèया फाईल्सवर यापुढे केवळ विभागप्रमुखाची स्वाक्षरी असून चालणार नाही तर त्यावर विभागप्रमुखाचा स्पष्ट अभिप्राय असणे आवश्यक असणार आहे. तसा अभिप्राय न देता केवळ स्वाक्षरी करून कनिष्ठ अधिका-याहाती फाईल मंजुरीसाठी पाठविल्यास विभागप्रमुख आणि नियंत्रण अधिकारी यांना जबाबदार धरले जाणार आहे. तसा आदेश आयुक्तांनी काढला आहे. पिंपरी चिंचवड महापालिका जशी श्रीमंत महापालिका म्हणून ओळखली जाते. तशीच अत्यंत बेशिस्त आणि भ्रष्ट कारभार असलेली महापालिका अशीही ओळखली जाते. अनेक वर्षे एकाच जागी ठाण मांडून बसलेल्या अधिकाèयांनी निर्माण केलेली भ्रष्टाचाराची कुरणे अबाधित रहावीत म्हणून ज्या वेगवेगळ्या प्रथापरंपरा निर्माण केल्या आहेत. त्यातील एक स्पष्ट अभिप्राय न देता केवळ आदेशार्थ असे म्हणून फाईल मंजुरीसाठी आयुक्तांकडे सादर करायची आणि नामानिराळे रहायचे ही देखील एक होती. तिला आळा घालण्यासाठी आता आयुक्तांनी हा आदेश जारी