Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

चाकण औद्योगिक वसाहतीची अधोगतीकडे वाटचाल..घनकचरा व्यवस्थापनाचा प्रश्न ऐरणीवर…

पिंपरी : ” इंडस्ट्रिअल हब ” म्हणून चाकण MIDC ची ओळख आहे. असे असले तरी येथील येथील उद्योजक वर्ग निरनिराळ्या समस्यांनी ग्रासलेला आहे. घनकचऱ्याची विल्हेवाट लावायची कुणी आणि कशी? त्यासाठी यंत्रणाच उपलब्ध नाही. व्यवसायाकडे लक्ष पुरवायचे की पायाभूत सुविधांकडे? या द्विधा चिंतेत उद्योजक सापडला आहे. याबाबत चाकण MIDC उद्योजक संघटनेचे अध्यक्ष जयदेव अक्कलकोटे यांनी एमआयडीसीचे कार्यकारी अभियंता संजय कोतवाड यांची चिंचवड कार्यालयात भेट घेतली. त्यांच्यापुढे उद्योजकांना भेडसावणाऱ्या समस्यांचा पाढाच त्यांनी वाचला. मुख्यत्वे घनकचरा व्यवस्थापनाचा प्रश्न कायमचा निकालात काढावा, अशी विनंती त्यांनी निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी संघटनेचे संचालक शांताराम ताम्हाणे, संघटनेचे इतर पदाधिकारी आणि उद्योजक मोठ्या संख्येने उपस्थित होते. चाकण MIDC उद्योजक संघटनेचे अध्यक्ष जयदेव अक्कलकोटे यांनी निवेदनात म्हटले आहे की, कोणत्याही पायाभूत सोयी-सुविधा नसताना लघु-मध्यम उद्योजकांनी बँकाकडून कर्ज तर, काहींनी पदरमोड करून मोठ्या हिमतीने चाकण MIDC परिसरात उद्योगधंदे सुरु केलेले आहेत. त्यासाठी काहींनी चिखली, तळवडे नॉन इंडस्ट्रियल भागातील त्यांचे सुरळीत असणारे उद्योगधंदे बंद केले. चाकण MIDC त जागा घेऊन त्यांनी उद्योगांचे स्थलांतर केले. सुरुवातीला MIDC नसल्यामुळे गाव कारभाऱ्यांच्या हाती येथील सत्ता होती. उद्योजकांकडून ग्रामपंचायतीला स्थानिक संस्था कर मिळत होता. ग्रामपंचायत असल्यामुळे विकासाला मर्यादा येत होत्या. त्यासाठी येथील उदयोगधंद्यांचा MIDC त समावेश करावा, अशी मागणी चाकण MIDC उद्योजक संघटनेने सरकारकडे केली होती. त्याला यश आले. येथील उद्योगधंद्यांचा चाकण MIDC त समावेश झाला. उद्योजकMIDC कडे नियमितपणे कर भरतात. मात्र MIDC चीही तीच तऱ्हा आहे, असेही त्यांनी म्हटले आहे. कंपन्यांमधील घनकचऱ्याचे रोजच्या रोज ढीग साचतायेत. त्याची विल्हेवाट लावायची कशी? या विवंचनेत येथील उद्योजक अडकलाय. उद्योजकांचा भ्रमनिरास झालाय. त्यातच येथील ग्रामपंचायती तो कचरा स्वीकारायला तयार नाहीत. MIDC हद्दीबाहेरील आस्थापना रात्री-अपरात्री परिसरात कचरा टाकून जातात. त्याचे खापरही येथील उद्योजकांवरच फुटतेय. ग्रामपंचायती तो कचरा जाळतात. त्यातून प्रदूषण वाढीस लागतेय. त्यामुळे घनकचरा व्यवस्थापनाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. MIDC परिसरातील समस्यांकडे आपण जातीने लक्ष पुरवावे. उद्योजकांना उद्योगास पोषक वातावरण निर्मितीसाठी सहकार्य करावे, असे या निवेदनात जयदेव अक्कलकोटे यांनी म्हटले आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...