Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

पुणे येथे तृतीयपंथीयांसाठी ओळखपत्र नोंदणी अभियान

पुणे-देशभरात सुरू असलेल्या राष्‍ट्रनेता ते राष्‍ट्रपिता सेवा दि. १७ सप्‍टेंबर ते ०२ ऑक्‍टोंबर पंधरवड्याच्या निमित्ताने दि. २८ सप्टेंबर, २०२२ रोजी तृतीयपंथीयांसाठी ओळखपत्र नोंदणी अभियान आणि ओळखपत्र वाटप शिबिराचे आयोजन, सहाय्यक आयुक्त समाज कल्याण पुणे, कै. अंकुशराव लांडगे शैक्षणिक सामाजिक ट्रस्ट पुणे आणि सेंटर फॉर अॅड्व्होकसी अँड रिसर्च संस्था (सिफार) यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग येथे करण्यात आले होते. तृतीयपंथी समुहातील व्यक्तींना विविध शासकीय योजनांचा लाभ सहजपणे मिळावा यासाठी त्यांची नोंदणी करण्याचे आणि त्यांना ओळखपत्र उपलब्ध करून देण्याचे काम सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग यांच्या वतीने सुरू आहे. या कामाला अधिक गती देण्यासाठी या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. याचबरोबर या शिबिरात आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदान कार्ड यासाठी आवश्यक कागदपत्राबाबत मार्गदर्शन तृतीयपंथीयांना उपलब्ध करून देण्यात आले. तृतीय पंथीसाठी करत असलेल्या कामाचा गौरव म्हणून मंथन फाउंडेशन च्या अध्यक्षा आशा भट्ट यांचा सत्कार करण्यात आला. तसेच पुणेरी प्राईड संस्थेचे श्री. प्रसाद गोंदकर, मिस्ट फाउंडेशनच्या सोनाली दळवी, सावली फाऊंडेश पुणेचे अमित मो‍हिते, रूट सेट संस्थेचे श्री. प्रवीण बनकर गौरविण्यात आले. यावेळी रविंद्र कदम पाटील उपायुक्त (नाहसं), समाज कल्याण आयुक्‍तालय पुणे, श्रीमंत पाटोळे, उपजिल्हाधिकारी पुणे (अन्न व नागरी पुरवठा), श्री.मुळे,(वित्त व लेखा) सहाय्यक संचालक,प्रादेशिक उपायुक्त, समाज कल्‍याण पुणे, वडगाव शेरी मतदारसंघ महानगरपालिकेचे उपायुक्त श्री. कडलक, श्रीम. रंजना गगे, उपायुक्त पुणे महानगरपालिका समाज कल्याण विभाग, श्री. प्रशांत खताळ ,अन्न व नागरी पुरवठा विभाग नायब तहसिलदार उपस्थित होते. तसेच अनेक तृतीय पंथी संस्था प्रतिनिधी उपस्थित होते. कार्यक्रमावेळी बोलताना,उपजिल्हाधिकारी श्रीमंत पाटोळे म्हणाले की, तृतीयपंथी संघटनांचे प्रतिनिधी आणि अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या एकत्रित पुढाकारातून तृतीयपंथी व्यक्तींना रेशन कार्ड उपलब्ध करून देण्यासाठी एकदिवसीय शिबिराचे आयोजन करण्यात येईल. रंजना गगे यांनी सांगितले की,पुणे महानगरपालिकेच्या वतीने तृतीयपंथीयांसाठी धोरण बनवण्याचे काम सुरू आहे ज्यामध्ये तृतीयपंथीयांना प्रशिक्षण, रोजगार प्राप्त करून देण्यासाठीच्या योजनांचा समावेश असेल. तृतीयपंथी यापुढेही अधिकाधिक तृतीयपंथी व्यक्तींनी पुढाकार घेऊन ओळखपत्र मिळणेसाठी ऑनलाईनरित्या नोंदणी करावी असे आवाहन रविंद्र कदम पाटील उपायुक्‍त (नाहसं), समाज कल्‍याण आयुक्‍तालय पुणे तसेच संगीता डावखर, सहाय्यक आयुक्त समाज कल्याण पुणे यांनी राज्‍यमध्‍ये तृतीयपंथी ओळखपत्र वाटपामध्‍ये पुणे जिल्‍हा आघाडीवर असून त्‍यांचेसाठीच्‍या योजनांची अमंलबजावणी करणेसाठी तृतीयपंथीयांची नोंदणी होणे आवश्‍यक असल्‍याचे सांगितले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...