Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

अ‍ॅट्रॉसिटीच्या तक्रारींमुळे तळेगावातील राजकीय वातावरण तापले! सुधाकर शेळके, किशोर आवारे, मिलिंद अच्युत यांच्याविरोधात जातिवाचक शिवीगाळ केल्याच्या तक्रारी!!

अ‍ॅट्रॉसिटीच्या तक्रारींमुळे तळेगावातील राजकीय वातावरण तापले! सुधाकर शेळके, किशोर आवारे, मिलिंद अच्युत यांच्याविरोधात जातिवाचक शिवीगाळ केल्याच्या तक्रारी तळेगाव दाभाडे : तळेगाव दाभाडे शहरातील राजकीय वातावरण जातिवाचक शिवीगाळीच्या दोन पोलिस तक्रारींमुळे तापले आहे. मावळचे आमदार सुनील शेळके यांचे बंधू सुधाकर शेळके यांच्यासह दोघे आणि जनसेवा विकास समितीचे संस्थापक अध्यक्ष किशोर आवारे व प्रवक्ते मिलिंद अच्युत यांच्याविरोधात तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात अ‍ॅट्रॉसिटीचे गुन्हे दाखल झाले आहेत. पहिल्या प्रकरणात प्रवीण सिद्धार्थ ओव्हाळ (वय 36, रा. तळेगाव) यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार सुधाकर शेळके, मॉण्टी दाभाडे (दोघे रा. तळेगाव दाभाडे) यांच्याविरोधात अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती 3(1) नुसार गुन्हा दाखल झाला आहे. हा प्रकार शनिवार दि.10 रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास लिंब फाटा येथे घडला. फिर्यादीत ओव्हाळ यांनी म्हटले आहे की,माजी नगराध्यक्षा सुलोचना आवारे यांच्या वाहनावर मी चालक म्हणून कार्यरत आहे. शनिवारी रात्री दहाच्या सुमारास तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात किशोरभाऊ आवारे यांना भेटण्यासाठी गेलो होतो.ठाण्यात गर्दी असल्याने लिंब फाटा येथे थांबलो. साडेदहाच्या सुमारास सुधाकर शेळके हे पोलिसांसोबत चालत तिथे आले होते.तर, मॉन्टी दाभाडे मोटारीतून आला होता. त्यावेळी त्याने ताईचा ड्रायव्हर आहे असे म्हणत माझा जातीवाचक उल्लेख केला. तसेच सुधाकर यानेही जातीवाचक बोलत घरी जा ना, बघतो तुझ्याकडे, असे म्हणाला. तसेच पोलिसांना मला घरी जाण्यासाठी सांगण्यास सांगितले. मला सार्वजनिक ठिकाणी अपमान करण्याच्या उद्देशाने जातीवाचक शिवीगाळ करुन धमकी दिली असे फिर्यादीत म्हटले आहे. तसेच दुसर्‍या प्रकरणात संदीप संजय सदावर्ते (वय 34, रा. तळेगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार किशोर आवारे, मिलिंद अच्युत यांच्याविरोधात अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती 3(1) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.हा प्रकार रविवार दि.11 रोजी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्याच्या आवारातील कॅन्टीनमध्ये सांयकाळी साडेसातच्या सुमारास घडला. सदावर्ते यांनी फिर्यादीत म्हटले आहे की, रविवारी मी सुधाकर शेळके यांच्यासोबत तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात आलो होतो. शेळके पोलीस ठाण्याच्या इमारतीत गेले असता मी कॅन्टीनच्या बाजूला थांबलो होतो. रात्री आठच्या सुमारास मिलिंद अच्युत व किशोर आवारे हे माझ्या गाडीजवळ आले, असता मी गाडीतून खाली उतरलो. त्यावेळी किशोरभाऊ यांनी मला तू इथे का आला असे म्हणून दमदाटी व शिवीगाळ सुरु केली. मिलिंद अच्युत यांनीही शिवीगाळ केली. जातीवाचक बोलत माजलास का, बघतो तुझ्याकडे, तुमचा माज उतरवला पाहिजे असे म्हणाले. दरम्यान सुधाकर शेळके आणि किशोर आवारे यांनी आपण जातिवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप फेटाळला आहे. नगरपरिषद निवडणुकांच्या तोंडावर राजकीय बदनामी करण्यासाठी आपल्या विरुद्ध अ‍ॅट्रॉसिटीचा खोटा गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असे सुधाकर शेळके यांनी म्हटले असून काही मंडळी दमदाटी करून तालुक्यात दहशतीचे वातावरण निर्माण करत आहेत. त्यामुळे गेले काही दिवस आपल्याला पोलिसांनी संरक्षण दिले आहे.त्यामुळे आपल्या प्रत्येक कृतीला पोलीस साक्षीदार आहेत.त्यामुळे आपल्याविरुद्ध कितीही खोट्या तक्रारी केल्या तरी त्याचा काहीही उपयोग होणार नाही असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. तर तळेगाव दाभाडे येथील जनसेवा विकास समितीचे संस्थापक अध्यक्ष किशोर आवारे हे त्यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याचे कळल्यानंतर स्वत:हून गुरुवारी रात्री पोलीसठाण्यात दाखल झाले. कोणत्याही चौकशीस सामोरे जाण्याची आपली तयारी आहे. राजकीय हेतूने आपल्या विरुद्ध हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संदर्भातील चौकशीसाठी पोलिसांना पूर्ण सहकार्य करण्याची आपली भूमिका राहील. मात्र, खोटेनाटे गुन्हे दाखल करून त्यात विनाकारण गोवले जाणार असेल तर ते खपवून घेणार नाही असे त्यांनी म्हटले आहे. याशिवाय फिर्यादीने जो गुन्हा घडल्याचा दिवस आणि वेळ फिर्यादीत नमूद केला आहे त्या वेळी मी तळेगावमध्येच नव्हतो. त्याबाबतची खातरजमा पोलीस करून घेऊ शकतात असेही आवारे यांनी स्पष्ट केले आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...