कर थकविणार्या सोसायट्यांना नोटीसा
9/22/2022 10:34:00 PM
0
पिंपरी : पिंपरी चिंचवड शहरातील हाउसिंग सोसायट्यांमधील 50 टक्क्यांपेक्षा अधिक सदनिकाधारकांनी मिळकतकर न भरल्यास सदनिका जप्त करण्याची कारवाई महापालिका करणार आहे. 600 पेक्षा अधिक हाउसिंग सोसायट्यांना तशा नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. यापूर्वी शहरातील 5 लाखांपेक्षा अधिक थकबाकी असलेल्या बिगरनिवासी मिळकतधारकांना जप्तीपूर्व नोटीस देण्यात आल्या आहेत. आता, थकबाकी असलेल्या सदनिकाधारकांना नोटिसा देण्यात आल्या आहेत. वाकड, थेरगाव, सांगवी, मोशी, चर्होली या करसंकलन विभागीय कार्यालयाने या नोटिसा दिल्या आहेत. नोटीस मिळाल्यानंतर मुदतीमध्ये मिळकतकराचे बिल न भरल्यास सदनिका जप्त केली जाणार आहे. त्याचबरोबर पाणीपुरवठाही खंडित केला जाणार आहे. करसंकलन विभागाच्या पथकास सोसायटीत प्रवेश न दिल्यास फौजदारी कारवाई केली जाणार आहे.

