386 जागांसाठी 1 लाख 30 हजार 470 अर्ज
9/22/2022 10:32:00 PM
0
पिंपरी : पिंपरी चिंचवड महापालिकेत रिक्त असलेल्या 386 पदांसाठी तब्बल तब्बल 1 लाख 30 हजार 470 जणांनी ऑनलाइन अर्ज केले आहेत. महापालिकेत ‘ब’ आणि ‘क’ अशा वर्गातील 386 पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू असून त्यासाठी महापालिकेने 19 सप्टेंबरपर्यंत अर्ज मागविले होते. अतिरिक्त कायदा सल्लागार, कायदा अधिकारी, उपमुख्य अग्निशमन अधिकारी, विभागीय अग्निशमन अधिकारी, उद्यान अधीक्षक वृक्ष (प्रत्येकी 1 जागा), सहायक उद्यान अधीक्षक, न्यायालयीन लिपिक व प्राणीरक्षक (प्रत्येकी 2 जागा), हॉर्टिकल्चर सुपरवायझर (जागा 8), समाजसेवक (जागा 3), स्थापत्य अभियांत्रिकी सहायक (जागा 41), लिपिक (जागा 213), आरोग्य निरीक्षक (जागा 13), उद्यान निरीक्षक (जागा 4), कनिष्ठ अभियंता स्थापत्य (जागा 75), कनिष्ठ अभियंता विद्युत (जागा 18) अशा 386 जागा भरल्या जाणार आहेत. या जागांसाठी खासगी कंपनीमार्फत लेखी परीक्षा घेतली जाणार आहे

