अग्रसेन जयंती उसाहात साजरी
9/27/2022 07:26:00 PM
0
पिंपरी : अग्रवाल समाजाचे दैवत महाराजा अग्रसेन यांची 5 हजार 124 वी जयंती प्राधिकरणातील श्री अग्रसेन ट्रस्टतर्फे सोमवारी उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी निगडी ते चिंचवड दरम्यान शोभायात्रा काढण्यात आली. यामध्ये सुमारे 700 बांधव सहभागी झाले होते. सर्व नगरसेवकांनी शुभेच्छा फलक लावून. महाराजांच्या प्रतिमेला हार अर्पण केला. यावेळी अग्रवाल समाज फेडरेशनचे अध्यक्ष उद्योजक कृष्णकुमार गोयल, म्हणाले कि, सध्याची कार्यकारिणी मनापासून समाज बांधवांना जोडण्याचे कार्य करीत आहे. समाजात असे पण लोक आहेत, की जे स्वतः काहीच करत नाही. दुसर्यांना करु देत नाहीत. ते फक्त चांगल्या कार्यात अडथळे निर्माण करतात. त्याना न घाबरता. तुम्ही प्रामाणिकपणे काम करावे, समजाने अशा लोकांना खड्यासारख़े बाजूला काढ़ावे आणि समजाला सशक्त व सुदृढ़ बनवावे. या शोभायात्रेची सांगता चिंचवड येथील श्री अग्रसेन भवन येथे झाली. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे पुणे येथील गोयल अग्रवाल समाजाचे अध्यक्ष ईश्वरचंद किशोरीलाल गोयल होते तर आयकर विभागाच्या आयुक्त अपर्णा मित्तल यांनी फोनवरुन सर्वांना शुभेच्छा दिल्या. यावेळी समाजाच्या अॅपचे उदघाटन झाले. सर्वांचे आभार सचिव सत्पाल मित्तल यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुभाष बंसल, सुनिल अग्रवाल, अशोक बंसल, जगदीशप्रसाद सिंघल, के. एल. बंसल, विनोद बंसल, विनोद मित्तल, जोगिन्दर मित्तल, सांस्कृतिक समितीचे गौरव अग्रवाल, आनंद अग्रवाल, धर्मेंद्र अग्रवाल, संदीप गुप्ता, सागर अग्रवाल यांचे मोलाचे सहकार्य लाभले. शुक्रवारी रामकृष्ण मोरे नाट्यगृहात मस्त मस्त म्यूज़िकल तम्बोला संदीप पंचवाटकर यांनी सादर केला. त्याला प्रमुख पाहुणे म्हणून येस क्लबचे संस्थापक नरेश मित्तल, आमदार अण्णा बनसोडे, माजी उपमहापौर शैलजा मोरे, माजी विरोधी पक्षनेते राजू मिसाळ, नगरसेविका शर्मिला बाबर, भाजपचे प्रदेश सचिव अमित गोरखे, निलेश शिंदे आदी उपस्थित होते.