पिंपरी : बंगभारतीतर्फे मासुळकर कॉलनीमध्ये दुर्गापूजा महोत्सव
9/27/2022 07:59:00 PM
0
पिंपरी: बंगभारती दुर्गा पूजा आणि काली पूजा समिती, पिंपरी चिंचवड तर्फे दिनांक 1 ते 5 ऑक्टोबर या कालावधीत दुर्गा पुजा महोत्सव मासुळकर कॉलनी, पिंपरी येथे आयोजित करण्यात आला आहे. बंगभारती गेली 37 वर्षे शहरात दुर्गापूजेचे आयोजन करत आहे. तर, गेली 49 वर्षे काली पूजेचे आयोजन केले जाते. मासुळकर कॉलनी येथील रंगास्वामी पेरूमल पिल्ले सांस्कृतिक भवनामध्ये हा कार्यक्रम होणार आहे. 1 ऑक्टोबर रोजी षष्ठीपूजा, पुष्पांजली, दुर्गा पूजेचा प्रारंभ आणि सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. 2 ऑक्टोबर रोजी सप्तमी पूजा, पुष्पांजली, आरती, सांस्कृतिक कार्यक्रम आणि महाप्रसाद होईल. 3 ऑक्टोबर रोजी महाअष्टमी आहे. त्या दिवशी महाअष्टमी पूजा, पुष्पांजली, संधीपूजा, बलिदान, पुष्पांजली, आरती, सांस्कृतिक कार्यक्रम आणि महाप्रसादाचे वाटप केले जाईल. या दिवशी कोलकात्यातील ख्यातनाम गायक राघव चट्टोपाध्याय यांचा कार्यक्रम होणार आहे. दिनांक 4 ऑक्टोबर रोजी महानवमीची पूजा, पुष्पांजली, सांस्कृतिक कार्यक्रम, महाप्रसाद होईल. 5 ऑक्टोबर रोजी दशमी पूजा, सिंदूर उत्सव, विजय संमेलन होणार आहे. भाविकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन बंगभारतीचे अध्यक्ष पी.के. भट्टाचार्य सचिव एन. सी. दत्ता आणि सुब्रतो मुजुमदार यांनी केले आहे.