Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

हवामानातील बदलांच्या परिणामांबद्दल डॉ राजेंद्र सिंह यांच्या उपस्थितीत लोक अदालत

 

पुणे : हवामानातील बदलांमुळे येणारे पूर व दुष्काळ  या समस्येवर उपाय सुचवणे व त्याची कार्यवाही करणे या हेतूने 'तेर पॉलिसी सेंटर व एम आय टी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी  यांच्या संयुक्त विद्यमाने ज्येष्ठ जलतज्ज्ञ डॉ राजेंद्र सिंह यांच्या अध्यक्षतेखाली एक दिवसाची लोक अदालत भरवण्यात येणार आहे. हा कार्यक्रम 4 ऑक्टोबर 2022 रोजी चाणक्य हॉल, सरस्वती विश्व, ए-बिल्डिंग, 5 वा मजला ,MIT-WPU, कोथरूड, पुणे येथे सकाळी 10 ते संध्याकाळी 4 या वेळेत होणार आहे. या सत्रात समुद्र आणि पर्यावरणाचे  अभ्यासक डॉ सुनील मुरलीधर शास्त्री, पर्यावरणप्रेमी कार्यकर्ते  सारंग यादवडकर,पुणे विद्यापीठाचे कुलगुरू  नितीन करमळकर, ज्येष्ठ पत्रकार  श्रीराम पवार (संपादक,दैनिक सकाळ)सहभागी होणार आहेत. 

तेर पॉलिसी सेंटरच्या संस्थापक संचालक डॉ विनिता आपटे यांनी पत्रकाद्वारे ही माहिती दिली. या लोकअदालतीमध्ये पर्यावरण प्रेमींनी सहभागी व्हावे ,सहभागा साठी खालील लिंक वर नाव नोंदणी करावी https://bit.ly/3E3DZuQ असे आवाहन करण्यात आले आहे.

या कार्यक्रमातून हवामान बदलाच्या वाढत्या परिणामांबद्दल लोकांच्या सूचना, उपाय यांचे मूल्यांकन आणि एकत्रीकरण करण्यात येईल. आपत्ती कमी करण्यासाठी व्यावहारिक मार्ग शोधणे आणि जगभरातील निसर्गाचे पुनरुज्जीवन करण्यात मदत करणे हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे. जनता, प्रसारमाध्यमे, पर्यावरण संस्था, सरकार, समुदाय आणि सर्व संबंधित समाजातील घटकांशी  संवाद साधून हे साध्य करायचे आहे. या संकटावर समुदाय आधारित उपाय शोधण्यासाठी जागतिक एकजुटीची नितांत गरज आहे. त्याबद्दल या लोक अदालतीमध्ये चर्चा होईल,असे डॉ विनिता आपटे यांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...