Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

अभिनेते सयाजी शिंदे यांच्या 'सह्याद्री देवराई 'संस्थेतर्फे रविवारी वृक्ष संवाद २०२२

 


यशस्वी वृक्ष लागवड करणाऱ्यांचा सत्कार 

पुणे : अभिनेते सयाजी शिंदे यांच्या 'सह्याद्री देवराई'संस्थेतर्फे रविवारी 'वृक्ष संवाद २०२२' हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.यशस्वी वृक्ष लागवड करणाऱ्यांचा आणि सह्याद्री देवराई 'संस्थेच्या कृतिशील सदस्यांचा  सत्कार या कार्यक्रमात करण्यात येणार आहे.९ ऑकटोबर,रविवारी सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळात रामकृष्ण मोरे सभागृह,पिंपरी-चिंचवड येथे हा कार्यक्रम होणार आहे.'सह्याद्री देवराई'संस्थेच्या सदस्यांकरिता तो मर्यादित असल्याने निमंत्रितांना प्रवेश देण्यात येणार आहे. 


पुणे वन विभागाचे उपवनसंरक्षक राहुल पाटील,अभिनेते सयाजी शिंदे,लेखक अरविंद जगताप,डॉ चंद्रकांत साळुंखे,सतीश आवटे,केतकी घाटे हे मान्यवर उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत.निसर्ग संवर्धनाचा संदेश पोहोचविण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...