Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

८ ऑक्टोबर रोजी औंधमध्ये 'सुपर हिरो कार्निव्हल '

 




पुणे :'इनोसंट टाईम्स 'स्कुल यांच्या वतीने ८ ऑक्टोबर रोजी गणेशबाग सोसायटी (औंध )मध्ये ' सुपर हिरो कार्निव्हल 'आयोजित करण्यात आला आहे.२ ते १३ वर्ष वयातील लहान मुले ,थेरपिस्ट आणि डॉक्टर्स त्यात सहभागी होतील.सकाळी १० ते सायंकाळी ६ पर्यंत हा कार्निव्हल सुरु राहणार आहे. 

सकाळी 'इनोसंट टाईम्स स्कुल 'आणि ' अर्ली इंटरव्हेंन्शन सेंटर फॉर चिल्ड्रन विथ स्पेशल नीडस् '  च्या नवीन इमारतीचे उदघाटन होणार आहे. अर्ली इंटरव्हेंन्शन प्रोग्राम फॉर  चिल्ड्रन विथ स्पेशल नीडस् '  , डे केअर,नर्सरी,ज्युनिअर के जी,सिनियर के जी च्या सर्वंकष शिक्षण (inclusive education )  शिक्षणाच्या सुविधा आहेत. अशी माहिती  'इनोसंट टाईम्स स्कुल ' च्या संस्थापक डॉ. अंकिता संघवी  यांनी दिली.

 स्वमग्नता (ऑटिझम) असलेल्या बालकांची विशेष काळजी विविध उपक्रमातून घेतली  जात असल्याचे त्यांनी सांगितले.डॉ.अंकिता संघवी या बालकल्याण संस्थेत ' अर्ली इंटरव्हेंन्शनीस्ट ' म्हणून विशेष मुलांसाठी, दिव्यांग मुलांसाठी कार्यरत आहेत.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...