Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

टायटन कंपनीच्या ’गो ग्रीन’ मॅरेथॉनचा प्रारंभ

 

मुंबई :   टायटन या टाटासमूहातील कंपनीने देशभरात एक लाखाहून अधिक झाडे लावण्याचा संकल्प केला असून त्यासाठी मॅरेथॉनच्या माध्यमातून ’गो ग्रीन’ हा उपक्रम सुरू केला आहे. याची सुरुवात टायटन कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सी. के.. वेंकटरामन यांच्या हस्ते झाली 

यावेळी बोलताना वेंकटरामन म्हणाले गो ग्रीन ही धरतीमातेशी एक होण्यासाठी सुरू असलेली एक कृती  आहे. शाश्वत जीवन जगणे, पर्यावरणीय दृष्ट्या जबाबदारीने निर्णय घेणे,   पर्यावरण पूरक पर्यायांचा अवलंब करणे आणि पर्यावरणा संवर्धनाच्या दृष्टीने हा एकमेव मार्ग आहे.

कंपनीच्या कॉर्पोरेट सस्टेनेबिलिटीचे उपाध्यक्ष आणि प्रमुख एन. ई. श्रीधर यावेळी म्हणाले; आम्ही टायटन कंपनीत नेहमी आमच्या कामांमध्ये शाश्वतता अंतर्भूत करण्यासाठी  सातत्याने प्रयत्न केले आहेत. एक जबाबदार संस्था म्हणून आम्ही आमच्या सहका-यांच्सोया साथीने  गो ग्रीन उपक्रमाचा शुभारंभ केला आहे. हवामान बदलाविषयी जागरूकता आणणे हा आमचा मुख्य हेतू आहे 


’गो ग्रीन’ मॅरेथॉनची सुरुवात पंतनगर ते बेंगळुरू या मार्गावर वृक्षारोपण करण्याच्या सामूहिक प्रतिज्ञासह मॅरेथॉन रिलेच्या माध्यमातून करण्यात आली. गो ग्रीन मॅरेथॉन  10 सप्टेंबर रोजी पंतनगर येथून रवाना झाली. ती दिल्ली, जयपूर, आजमगड, लखनऊ, चंदिगड, अहमदाबाद, वडोदरा मार्गे 3 ऑक्टोबर रोजी मुंबई येथे पोहोचली. या उपक्रमांतर्गत टायटन कंपनी वृक्षारोपण मोहीम राबवणार असून जी. एन.जी. ओ. बायोटासोईल फाउंडेशन, टाटा मोटर्स आणि टाटा पॉवर यांचे कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबासह समाजातील अन्य घटकांना वृक्षारोपण करण्यास प्रेरित करणार आहे.


टायटन कंपनी पर्यावरण संवर्धनासाठी कटिबद्ध आहे वृक्षारोपण मोहिमेचा एक जगवा, एक किंवा अधिक झाडे प्रायोजित करा. एका लहान बदलापासून सुरुवात करा असे आवाहन कंपनीने स्वयंसेवकांना केले आहे टायटन कंपनी स्वतः निसर्ग संवर्धनाबाबत जागरूक असून आपली ऊर्जेची  65 टक्क्यांपेक्षा जास्त गरज पवन आणि सौर ऊर्जेतून भागवते. या कंपनीच्या सी. एस. आर. प्रयत्नातून तलावांचे पुनरुज्जीवन केले गेले. बंधारे बांधले गेले. देशभरात हजारो झाडे लावली. होसूर येथे दोन मियावाकी जंगले वसवली गेली आहेत. कंपनीने आपल्या कॉर्पोरेट कार्यालयाजवळ असलेल्या एका मोठ्या तलावाचे पुनरुज्जीवन केले आहे. पंतनगर येथील एका लहान जलसाठ्याचेही पुनरुज्जीवन केले आहे.




अधिक जाणून घेण्यासाठी टायटन को ग्रीन उपक्रमाचा भाग होण्यासाठी https://gogreen.titancompany.in/ या लिंक ला भेट द्यावी असे आवाहन टायटन कंपनीतर्फे करण्यात आले आहे.

टाटा समूह आणि तामिळनाडू इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन यांच्या संयुक्त विद्यमाने 1987 मध्ये टायटन वॉचेस लिमिटेड या नावाने ही कंपनी सुरू झाली. 1994 मध्ये टायटनने ज्वेलरी, त्यानंतर आयवेअर, परफ़्युम्स, कपडे यांच्या श्रेणी बाजारात आणल्या मागील आर्थिक वर्षात कंपनीने 27 हजार 200 कोटी रुपयांचे स्वतंत्र उत्पन्न नोंदवले आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...