चिंचवड: चिंचवड गावात २६ सप्टेंबर ते ०५ ऑक्टोबर दरम्यान चिंचवड नवरात्र महोत्सवाचे आयोजन केले आहे.या महोत्सवादरम्यान २ व ३ ऑक्टोबर २०२२ दरम्यान महाआरोग्य शिबिराचे आयोजन केले होते. यात नेत्र चिकित्सा, सवलतीच्या दरात चष्मे वाटप, आरोग्य चिकित्सा व औषध वाटप करण्यात आले. ३८८ नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला. माजी नगरसेविका अश्विनी गजानन चिंचवडे-पाटील यांनी शिबिराच्या आयोजनासाठी श्रम घेतले.
या प्रसंगी माजी पक्षनेते नामदेवजी ढाके, महावितरण समिती सदस्य मधुकर बच्चे व अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे कार्याध्यक्ष महेश बारसावडे, संघटन मंत्री सचिन बोधनी, पिंपरी चिंचवड मेडिकल फौंडेशनचे राव, तसेच दुर्गेश देशमुख, संदीप दळवी, संतोष राका, नीलेश दळवी, रामचंद्र जमखंडी, माणिक म्हेत्रे, विजय कांबळे, शुभम शिंदे, संदीप माने, हेमा कस्तुरे, स्वाती चौधरी, पुष्पा पाटील, वर्षा जाधव, दिपाली नेवसे यांची उपस्थिती होती.