Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

शरदचंद्र पवार महाविद्यालयात कला शाखेचा प्रेरण कार्यक्रम

 


आळंदीश्री गजानन महाराज शिक्षण प्रसारक मंडळ संचलितशरदचंद्र पवार कला आणि वाणिज्य महाविद्यालय,   डुडूळगाव या ठिकाणी कला शाखेच्या वतीने प्रेरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक करतांना कला शाखेचे  विभाग प्रमुख प्राकैलास अस्तरकर यांनी शाखेचे महत्व स्पष्ट करतांना  या शाखेला स्पर्धेच्या युगात किती महत्वाचे स्थान असून  या कार्यक्रमाचा उद्देशध्येय  तसेच कला शाखेमध्ये किती विषयाचा समावेश असून त्या प्रत्येक विषयाला कसे महत्त्व आहे तसेच पुणे विद्यापीठाने पदवी शिक्षणात स्वीकारलेली श्रेणी पद्धत विद्यार्थ्यांसाठी कशी  महत्वाची आहे याबाबत सविस्तर विवेचन केले.

यावेळी प्राडॉपांडुरंग मिसाळ यांनी श्री गजानन महाराज शिक्षण संस्थेचा परिचयमराठी विभाग   सांस्कृतिक विभागाचा परिचय करून दिला. तसेच सर्व उपस्थित विद्यार्थी  सहाय्यक प्राध्यापक यांनी आपला परिचय करून  दिला

 अध्यक्षीय  मनोगत व्यक्त करतांना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉहंसराज थोरात  यांनी विद्यार्थ्यांनी उराशी बाळगलेले स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्ही नेहमी तत्पर असून या प्रसंगी त्यांनी माणूस हा दोन वेळा यशस्वी होतो एक म्हणजे स्वप्न पाहतो त्या वेळी आणि जेव्हा  त्याचे स्वप्न पूर्ण होते त्यावेळी या संदर्भात त्यांनी प्रसिद्ध भारतीय उद्योगपती रतन टाटा यांचा उल्लेख केलात्यांनी आपल्या मनोगतात अल्बर्ट आईन्स्टाईनमहात्मा गांधी,कॉम्रेड गोविंद पानसरेडॉनरेंद्र दाभोळकर यांच्या विचारांची तरुण पिढीला कशी आवश्यकता आहे हे विविध उदाहरणासह विवेचन केलेमहात्मा गांधीनी सांगितलेल्या सत्य अहिंसाअपरिग्रहहरताळउपोषण या अनमोल मूल्यांची आधुनिक काळात कशी आवश्यकता आहे यासंदर्भात विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन करीत भावी आयुष्यासाठी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्यायाप्रसंगी कला शाखेतील विद्यार्थ्यांनी कथा,कविता  नृत्यातील वेगवेगळे कला प्रकार सादर केले.

या कार्यक्रमाला प्रवीण भावेप्रा.दिलीप बारी,  प्रा.दिपाली सोनवणेप्राविश्वनाथ व्यवहारेप्रा.प्रेरणा पाटीलप्रासोनाली अभंग,वैभव बडवे, श्रीकांत कांबळे  कला शाखेतील सर्व विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  कल्याणी खांदवे  काजल फुंदसे यांनी केले तर उपस्थितांचे आभार प्रापरमेश्वर भताशे यांनी मानले





Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...