Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

बिझनेस न्यूज : इलेक्ट्रिक कार्सच्या मागणीमध्‍ये १३४ टक्‍क्‍यांनी वाढ; जस्ट डायलचा निष्कर्ष

 


मुंबई : नवीन जस्‍टडायल कंझ्युमर इनसाइट्स अहवालाच्‍या मतेयंदा सणासुदीच्‍या काळात इलेक्ट्रिक कार्ससाठी मागणी १३४ टक्‍क्‍यांनी वाढली आणि प्रथम श्रेणीच्‍या शहरांच्‍या तुलनेत द्वितीय श्रेणीचे नगर व शहरांमध्‍ये इलेक्ट्रिक कार्सप्रती लोकप्रियता झपाट्याने वाढत आहे.

भारतातील द्वितीय श्रेणीचे नगर व शहरांमध्‍ये इलेक्ट्रिक कार्सप्रती मागणीमध्‍ये वाढ १२२ टक्‍के होतीतर प्रथम श्रेणीच्‍या शहरांमध्‍ये ८९ टक्‍के होती. यामध्‍ये सर्वाधिक मागणी टाटा नेक्‍सॉनसाठी होतीज्‍यानंतर टाटा टिगोरएमजी झेडएस व ह्युदांई कोना यांचा क्रमांक होता. देशभरात इलेक्ट्रिक कार्ससाठी मागणीमध्‍ये बेंगळुरू अव्‍वलस्‍थानी होतेज्‍यानंतर दिल्‍ली व मुंबईचा क्रमांक होता. द्वितीय श्रेणीच्‍या शहरांमध्‍ये सर्वाधिक मागणी दक्षिण भारतीय शहरांमधून आलीजेथे एर्नाकुलम अव्‍वलस्‍थानी होतेज्‍यानंतर इंदौरकोझीकोडेसुरत व मदुराई या शहरांचा क्रमांक होता.   

या ट्रेण्‍ड्सबाबत बोलताना जस्‍टडायलचे सीएमओ श्री. प्रसून कुमार म्‍हणाले, “आज जवळपास ९२ टक्‍के कार खरेदी ऑनलाइन केली जाते आणि जस्‍टडायलमध्‍ये आम्‍ही व्‍यासपीठावर खरीखुरी माहिती सादर केली आहे. ज्‍यामुळे कार खरेदीदारांना योग्‍य निर्णय घेण्‍यास मदत होते. मागील काही वर्षांमध्‍ये पर्यावरणास अनुकूल वाहनांप्रती मागणीमध्‍ये वाढ होताना दिसण्‍यात आली आहे आणि याच बाबीचा परिणाम व्‍यासपीठावरील ग्राहकांच्‍या वर्तणूकीमधून दिसून येत आहे. जस्‍टडायल कार खरेदीदारांना त्‍यांच्‍या स्‍वप्‍नवत कारसाठी स्‍थानिक परिसरातील सर्वोत्तम डिलर्सपर्यंत पोहोचण्‍यास मदत करत वाढत्‍या मागणीची पूर्तता करत असल्‍याचे पाहून प्रेरणादायी वाटते. आम्‍ही आशा करतो की, कोविडनंतर स्थिती सुधारत असताना मागणीमधील ही वाढ कार डिलर्ससाठी बंपर विक्रीची खात्री देईल.’’

इलेक्ट्रिक वाहनांसह या सणासुदीच्‍या काळादरम्‍यान इतर कार्ससाठी मागणीमध्‍ये ३९ टक्‍क्‍यांची (वार्षिक) वाढ दिसण्‍यात आली. मारूतीह्युंदाईटाटामहिंद्रा व होंडा हे देशातील टॉप-५ सर्वाधिक सर्च करण्‍यात आलेले ऑटोमोबाइल ब्रॅण्‍ड्स ठरले. प्रथम श्रेणीच्‍या शहरांमध्‍ये मागणी स्थिर राहिलीपण द्वितीय श्रेणीच्‍या शहरांमध्‍ये मागणीत ७३ टक्‍क्‍यांनी वाढ झाली.  

प्रथम श्रेणीच्‍या शहरांमध्‍ये दिल्‍ली हे मागणीमधील ३० टक्‍क्‍यांच्‍या योगदानासह अव्‍वलस्‍थानी राहिलेज्‍यानंतर मुंबई व पुणे यांचा क्रमांक होता. लखनौजयपूरचंदिगडपटना व कोईम्‍बतूर ही टॉप ५ द्वितीय श्रेणीची नगर व शहरे ठरलीजेथे कार्ससाठी सर्वाधिक मागणी दिसण्‍यात आली.

भारतातील सर्वात मोठा ऑटोमोबाइल उत्‍पादक कंपनी मारूती सर्वात पसंतीची ब्रॅण्‍ड राहिलातर प्रथम श्रेणीच्‍या शहरांमध्‍ये होंडा कार्ससाठी मागणीमध्‍ये प्रचंड ७० टक्‍क्‍यांची (वार्षिक) वाढ दिसण्‍यात आली. द्वितीय श्रेणीच्‍या शहरांमध्‍ये ह्युंदाई कार्ससाठी मागणीमध्‍ये व्‍यापक १७६ टक्‍क्‍यांची वाढ दिसण्‍यात आलीतर होंडा (९९ टक्‍के) दुसऱ्या स्‍थानी होते.

प्रथम श्रेणीच्‍या शहरांमध्‍ये मारूती सुझुकी एर्टिगा सर्वाधिक सर्च करण्‍यात आलेली मॉडेल ठरलीज्‍यानंतर स्विफ्ट डिझायरमहिंद्रा स्‍कॉर्पिओटाटा नेक्‍सॉनहोंडा सिटीह्युंदाई क्रेटामहिंद्रा बोलेरोकिया सेल्‍टोससुझुकी स्विफ्ट आणि महिंद्रा थार यांचा क्रमांक होता.

द्वितीय श्रेणीच्‍या शहरांमध्‍ये महिंद्रा बोलेरो सर्वाधिक सर्च करण्‍यात आलेली मॉडेल ठरलीज्‍यानंतर मारूती सुझुकी एर्टिगामहिंद्रा स्‍कॉर्पिओमारूती सुझुकी स्विफ्ट डिझायरमारूती सुझुकी स्विफ्टमहिंद्रा थारटाटा नॅनोह्युंदाई क्रेटाहोंडा सिटी व ह्युंदाई वेर्ना यांचा क्रमांक होता.  

देशामध्‍ये आलिशान कार्ससाठी मागणी देखील स्थिर राहिलीजेथे प्रथम श्रेणीच्‍या शहरांमध्‍ये मर्सिडीज सर्वात लोकप्रिय ब्रॅण्‍ड होता आणि द्वितीय श्रेणीच्‍या शहरांमध्‍ये बीएमडब्‍ल्‍यू लोकप्रिय ब्रॅण्‍ड होता. भारतभरातील आलिशान कार्ससंदर्भात दिल्‍ली अव्‍वलस्‍थानी होतेज्‍यानंतर मुंबई व बेंगळुरूचा क्रमांक होता. द्वितीय श्रेणीच्‍या शहरांमध्‍ये पटना ऑडीसाठीरायपूर बीएमडब्‍ल्‍यूसाठी आणि चंदिगड मर्सिडीजसाठी अव्‍वलस्‍थानी होते.  

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...