पिंपरी : नागरिकांच्या सोयीसाठी विविध ठिकाणी नव्याने पीएमपीएमएलचे बस स्थानक उभारण्यात यावेत. विद्युत खांबांवर अनधिकृतपणे लावण्यात आलेले फ्लेक्स वा-यामुळे उडून नागरिकांवर पडत असून त्यामुळे जीवितास धोका निर्माण झाला आहे. असे फ्लेक्स तातडीने काढावेत, अनधिकृतपणे फ्लेक्स लावणाऱ्यांवर कारवाई करावी, अशा तक्रारी नागरिकांनी जनसंवाद सभेत मांडल्या.
आज पार पडलेल्या जनसंवाद सभेत ५४ नागरिकांनी सहभाग घेऊन तक्रारी मांडल्या. यात अ, ब, क, ड, इ, फ, ग आणि ह क्षेत्रीय कार्यालयामध्ये अनुक्रमे १६, ४, ३, ६, ४, १, ८ आणि १२ इतक्या नागरिकांनी उपस्थित राहून आपले म्हणणे मांडले.
अ, ब, क, ड, ई, फ, ग, ह, या क्षेत्रीय कार्यालयांच्या जनसंवाद सभेचे अध्यक्षपद मुख्य समन्वय अधिकारी असलेले अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप, पाणीपुरवठा विभागाचे सह शहर अभियंता श्रीकांत सवणे, सह शहर अभियंता प्रमोद ओंभासे, उप आयुक्त चंद्रकांत इंदलकर, आरोग्य विभागाचे उप आयुक्त अजय चारठाणकर, सहायक आयुक्त प्रशांत जोशी, यांनी भूषवले.

