Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

पिंपरी चिंचवड : महापालिका कर्मचा-यांची दिवाळी गोड

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिका कर्मचा-यांना ८.३३ टक्के बोनस आणि जादा २० हजार रुपये रक्कम देण्यात येणार आहे. आयुक्त शेखर सिंह यांनी हा निर्णय घेतला. त्यामुळे साडेआठ हजार कर्मचा-यांची दिवाळी गोड होणार आहे. 

यासंदर्भातील आदेश प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त बाळासाहेब खांडेकर यांनी काढला आहे. पिंपरी - चिंचवड महापालिका कर्मचारी महासंघ आणि पिंपरी - चिंचवड महापालिका यांच्यात गेल्यावर्षी पंचवार्षिक वेतन करार झाला आहे. २०२०-२१ ते २०२४-२५ पर्यंत हा करार आहे. गेल्यावर्षी झालेल्या करार करताना पाच हजार रुपयांनी सानुग्रह अनुदानात वाढ केली होती.त्यानुसार वर्ग १ ते ४ मधील अधिकारी, कर्मचा-यांना ८.३३ टक्के बोनस आणि जादा २० हजार रुपये रक्कम देण्यास आयुक्तांनी मान्यता दिली आहे. या बोनसचा महापालिकेतील साडेआठ हजार कर्मचा-यांना लाभ होणार आहे. त्यामुळे कर्मचा-यांनी आनंद व्यक्त केला आहे. 

प्रभाग अधिकारी व विभागप्रमुख यांनी २०२२-२३ च्या अंदाजपत्रकामध्ये सानुग्रह अनुदान व जादा रक्कम अदाईगी करण्याच्या लेखा शीर्षकाखाली केलेली तरतूद अपुरी पडल्यास तरतूद वर्गीकरण करून त्याची कारवाई करावी. 

तसेच ८.३३ टक्के सानुग्रह अनुदान आणि जादा २० हजार रुपये रक्कम सर्व कर्मचा-यांना दिवाळी पूर्वी मिळेल याची दक्षता घ्यावी. त्याबाबतची बिले तयार करून तातडीने लेखा विभागाकडे सादर करावीत. 

लेखा विभागाने तातडीने बिले तपासून रक्कम अदा करण्याबाबत कार्यवाही करावी. बिले विलंब झाल्यास शाखा प्रमुखांना जबाबदार धरले जाईल असा इशारा आयुक्तांनी दिला आहे.

 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...