Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

महापालिकेच्या वतीने जेष्ठ नागरिक दिन विविध कार्यक्रमांनी साजरा

 


पिंपरी :  ज्येष्ठ मंडळींनी आपल्या जीवनाची वाटचाल आनंदानेआरोग्य संपन्नतेने करून शतायुषी व्हावे असे प्रतिपादन महानगरपालिकेचे  अतिरिक जितेंद्र वाघ यांनी केले.

    पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने एक ऑक्टोबर ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त चिंचवड येथील प्रा.रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह येथे आयोजित कार्यक्रमात मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

   यावेळी पोलिस उपआयुक्त मंचक इप्परसमाज विकास विभागाचे उपआयुक्त चंद्रकांत इंदलकर, समाज विकास अधिकारी सुहास बहादरपूरे, चिंचवड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कृष्णदेव दराडे, जनसंपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक तसेच शहरातील विविध भागातील जेष्ठ नागरिक उपस्थित होते.
    अतिरिक्त आयुक्त वाघ यांनी ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या तसेच ज्येष्ठ नागरिक संघाने केलेल्या विविध सूचनांचा सकारात्मक विचार करून महापालिकेच्या वतीने जेष्ठ मंडळींना सहकार्य करण्यात येईल असे सांगितले.
     पोलीस उपायुक्त मंचक इप्पर यांनी सध्याची स्थिती पाहता जीवनस्तर सुधारत असून ज्येष्ठ नागरिकांची संख्या वाढत आहे. त्यामुळे सर्वांनी ज्येष्ठांकडे सकारात्मक दृष्टीने पाहावे,त्यांचा आदर करावा तसेच त्यांच्या अनुभवाचामार्गदर्शनाचा उपयोग करून घ्यावाअसे सांगून त्यांनी ज्येष्ठ नागरिक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
   समाज विकास विभागाचे उपायुक्त चंद्रकांत इंदलकर यांनी प्रास्ताविकात शहरातील विविध भागात १३४ ज्येष्ठ नागरिकांचे नोंदणीकृत संघ असल्याचे सांगितले. दर वर्षी ज्येष्ठ नागरिकांच्या सन्मानार्थ एक ऑक्टोबर ह्या दिवशी तज्ञांचे व्याख्यानमार्गदर्शन तसेच मनोरंजनाचे कार्यक्रम विभागामार्फत घेण्यात येत  असून यावर्षी ११६ ज्येष्ठ नागरिक संघाना भेट म्हणून टीव्हीचे वाटप करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.



    आजच्या कार्यक्रमात ज्येष्ठ नागरिक महासंघ पिंपरी चिंचवड शहराचे अध्यक्ष अरुण बागडेकार्याध्यक्ष वृषाली मरळसरचिटणीस हरिनारायण शेळकेपदाधिकारी मधुकर कसबेकरविठ्ठल चौधरीशांताराम सातवबाबुराव फुलेगजानन ढमालेबि. आर. माडगूळकरचंद्रकांत पारखीईश्वर चौधरीखंडू बिरदवडेनारायण गोडसेमाधव अडसुळेसुभाष सराफसुनिता कोकाटेबाळकृष्ण गायकवाडहेमचंद साळवे,दुंडय्या स्वामीहोनाजी कोंढावळेतुकाराम कुदळेचंद्रशेखर हुनशाळरमेश फाटकेसदाशिव पाटीलविष्णुपंत गुल्हानेयशवंत साने आणि पंडित खरात यांचा मान्यवरांच्सया हस्ते सत्कार करण्यात आला.

तसेच यावेळी "आनंद मेळावा" या अंकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...