नवी मुंबई : ऐरोलीचे आमदार गणेश नाईक यांनी शुक्रवारी नवी मुंबई पालिका मुख्यालयात येऊन नवनियुक्त पालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांची भेट घेतली. विविध विषयांवर चर्चेपूर्वी गणेश नाईक यांनी नार्वेकर यांचे स्वागत केले.
या बैठकीत शहरातील सिडको आणि एम. आय. डी. सी. चे भूखंड विकले जात असल्याबद्दल नाईक यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली, रायगड आणि सिंधुदुर्गातील काही एजंट या विक्रीमध्ये मध्यस्थाची भूमिका बजावत आहेत असा आरोपही आमदार नाईक यांनी केला. यासंदर्भात आयुक्तांनी सिडकोसोबत बैठक आयोजित करावी अशी सूचना त्यांनी यावेळी केली.
