पिंपरी : पिंपरीतील एच ए मैदानात 15 ऑक्टोबर रोजी धम्म परिवर्तन मेळावा होणार आहे. भारतीय बौद्ध महासभा तसेच द बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया व समाज विकास महासंघ आणि इतर संस्था संघटना व बुद्धविहारांच्यावतीने याचे आयोजन करण्यात आले आहे; आंबेडकरी चळवळीतील नेते डी व्ही सुरवसे आणि सर्वजित बनसोडे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
ज्येष्ठ नेते प्रकाश आंबेडकर या मेळाव्यातून जनतेशी संवाद साधणार आहेत. यावेळी भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष भीमराव यशवंत आंबेडकर, अंजली प्रकाश आंबेडकर ,बौद्धजन पंचायत समितीचे सभापती आनंदराज आंबेडकर,रेणुका ठाकूर आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
या मेळाव्याला पश्चिम महाराष्ट्रातून आणि राज्यभरातून लोक मोठ्या संख्येने येणार आहेत; अशी माहिती सुरवसे यांनी दिली.
