Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

आजपासून चिंचवड नवरात्र महोत्सव!

चिंचवड : चिंचवडगाव येथे आज दिनांक 26 सप्टेंबर ते 05 ऑक्टोबर दरम्यान चिंचवड नवरात्र महोत्सवाचे आयोजन केले आहे. त्यासाठी गजमहाल प्रतिकृती व साडेतीन शक्तीपीठ दर्शन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती चिंचवड नवरात्र महोत्सव संयोजक, माजी नगरसेविका अश्‍विनी चिंचवडे यांनी दिली. चिंचवड नवरात्र महोत्सवामध्ये गजमहाल प्रतिकृती उभारली आहे. गजानन चिंचवडे यांच्या संकल्पनेतून या महोत्सवाची सुरुवात झाली होती. सलग 10 वर्षांपासून परंपरा सुरू आहे. आज दि. 26 सप्टेंबर रोजी देवीची स्थापना करण्यात येणार आहे. त्यानंतर स्वानंद धुपारती मंडळाची धुपारती होईल. दि. 2 व 3 ऑक्टोबर 2022 रोजी सकाळी 10 ते दुपारी 4 या वेळेत मोफत नेत्रचिकित्सा शिबीर व सवलतीच्या दरात चष्मे वाटप होणार आहे. सायंकाळी 5 वाजता गौरीगणपती सजावट स्पर्धेच्या बक्षिस वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. दि. 1 ते दि. 5 ऑक्टोबर या कालावधीत श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या अक्कलकोट येथील पादुकांचा दर्शन सोहळा, पूर्ण नवरात्र कालावधीमध्ये तुळजापूरची तुळजाभवानी, कोल्हापूरची महालक्ष्मी, वणीची सप्तशृंगी, माहुरगडची रेणुका या साडेतीन शक्तीपीठ दर्शनाचा सोहळा, सकाळी 8 वाजता व सायंकाळी 7 वा देवीची महाआरती, चिंचवडमधील विविध भजनी मंडळांची भजन सेवा, मोरया चरित्र पठण व सप्तशती पाठ यांचे आयोजन चिंचवडमधील श्री मोरया गोसावी समाधी मंदिर रस्त्यावरील अश्विनी चिंचवडे यांच्या जनसंपर्क कार्यालयासमोर करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...