Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

वेदांता फॉक्सकॉन कंपनीबाबत जनतेची दिशाभूल : आमदार राम कदम

लोणावळा : महाविकास आघाडीने वेदांता फॉक्सकॉन कंपनीकडे किती कोटीची खंडणी मागितली याची माहिती आदित्य ठाकरे यांनी द्यावी असे आव्हान भाजप आमदार व प्रवक्ता राम कदम यांनी सोमवारी वडगाव मावळ येथे दिले. आदित्य ठाकरे यांनी मावळात येऊन वेदांता फॉक्सकॉन प्रकल्पाबाबत चुकीची माहिती युवकांना देत त्यांची व महाराष्ट्रातील जनतेची दिशाभूल केली. असा आरोप करत भाजपच्यावतीने महाविकास आघाडी सरकारचा निषेध नोंदविण्यासाठी वडगाव मावळ येथे ठिय्या आंदोलन करण्यात आले. यावेळी बोलताना कदम यांनी महाविकास आघाडी तसेच माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरे यांच्यावर टीका केली. महाविकास अघाडी सरकारने वेदांता फॉक्सकॉन सोबत करार कधी केलाच नाही, एमओयूही केला नाही, भूसंपादन केले नाही तरीही ते हा प्रकल्प राज्याबाहेर गेल्याची ओरड करत जनतेची दिशाभूल करत आहेत असा आरोप यावेळी कदम यांनी केला. यावेळी खासदार श्रीरंग बारणे, माजी मंत्री बाळा भेगडे, आरपीआयचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सुर्यकांत वाघमारे, भाजपा जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे, तालुकाध्यक्ष रविंद्र भेगडे यांच्यासह आरपीआय तालुकाध्यक्ष लक्ष्मण भालेराव व शिंदे गटातील मान्यवरांनी मनोगते व्यक्त करत महाविकास आघाडीवर हल्लाबोल केला. आमदार कदम पुढे म्हणाले, ज्यावेळी वेदांता फॉक्सकॉनचे अधिकारी प्रकल्प महाराष्ट्रात व तो देखील तळेगाव येथे करायचा असे म्हणत होते तेव्हा यांच्या तोंडावरील मास्क देखील खाली आला नाही. जे स्वतःच्या आमदार व खासदारांना दोन वर्षात भेटले नाही ते कंपनीच्या अधिकार्‍यांना कधी भेटणार? आदित्य ठाकरे यांच्यात नैतिकता शिल्लक असेल तर त्यांनी महाराष्ट्रातील जनतेची वडगाव मावळ येथे पुन्हा येऊन माफी मागावी अन्यथा प्रशासनाकडून मिळालेला उत्तराचा कागद घेऊन आम्ही महाराष्ट्रातील गावागावत जाऊन आदित्य ठाकरे यांचा दावा कसा फसवा आहे हे सांगू असा इशाराही त्यांनी दिला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अडीच वर्षात फक्त पाच वेळा मंत्रालयात गेले. ते सहाव्यांदा गेले असल्याचे पुरावे द्या व 1 कोटीचे बक्षिस मिळावा अशी ऑफर राम कदम यांनी दिली. जे कधी मंत्रालयात गेलेच नाहीत ते प्रकल्प राज्याबाहेर गेल्याची ओरड करत जनतेची दिशाभूल करत आहेत. महाविकास आघाडीने करार केला असला तर आज तुमच्या आमच्या मुलांवर नोकरीसाठी वणवण फिरायची वेळ आली नसती अशी टीकाही कदम यांनी केली.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...