मंथन फाउंडेशनतर्फ़े बुधवार पेठेत पोषणआहार वाटप
9/29/2022 12:41:00 PM
0
पुणे :मंथन फाउंडेशन, महान एनजीओ फेडरेशन व भगीरथ तापडिया ट्रस्ट यांच्या संयुक्तविद्यमाने पुण्यातील बुधवार पेठेत पोषण आहाराचे वाटप करण्यात आले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र शासनाच्यावतीने सेवा पंधरवडा साजरा करण्याबाबत सरकारी कार्यलयास निर्देश दिले त्या प्रेरणेतून सामाजिक संस्था देखील महा एनजीओ फेडरेशनच्या माध्यमातून प्रेरित होऊन शेखर मुंदडा यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्राभर राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंढरवडा साजरा करत आहेत. मंथन फाउंडेशनने या निमित्त बुधवार पेठ येथील एचआयव्हीसह जगणाऱ्या ९० महिलांना पोषण आहाराचे वाटप करण्यात केले.महाराष्ट्रात ७२ ठिकाणी मंथन फाउंडेशन सेवा पंधरवडा साजरा करत आहे. राजेंद्रजी तापडिया यांच्या भगिरथ तापडिया ट्रस्टच्या माध्यमातून पोषण आहार महिलांना देण्यात आला.आर्ट ऑफ लिविंगच्या माध्यमातून या महिलांच्या मानसिक आरोग्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येणार आहेत.यावेळी आर्ट ऑफ लिविंगचे राजे शास्त्रेय, पोलीस उपनिरीक्षक कीर्ती म्हस्के, भगिरथ तापडिया ट्रस्टचे प्रतिनिधी संदेश मानकर, महा एनजीओ फेडरेशनचे संचालक मुकुंद शिंदे, गणेश बाकले, पुणे मनपाच्या माजी नगरसेविका अस्मिता शिंदे , अक्षय भोसले आणि मंथन फाउंडेशनच्या अध्यक्षा आशा भट्ट, दीपक निकम व इतर सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी उपस्थित महिलांनी ध्यान शिबिराची अनुभूती घेतली.