Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

खरी शिवसेना ही बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांची व उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाची - अंबादास दानवे

लोणावळा : खरी शिवसेना कोणाची याचा चेंडू सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाकडे टोलवला आहे. यावर बोलताना अंबदास दानवे यांनी खरी शिवसेना ही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांची व पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाची आहे असे सांगितले. लोणावळ्यात आज अंबदास दानवे यांनी लोणावळा शिवसेना संपर्क कार्यालयाला भेट देत शिवसैनिकांशी संवाद साधला. यावेळी शिवसेना माजी पुणे जिल्हाप्रमुख मच्छिंद्र खराडे, लोणावळा शहरप्रमुख बाळासाहेब फाटक, उपजिल्हाप्रमुख भारत ठाकूर, सुरेश गायकवाड, शांताराम भोते, युवासेना जिल्हा अधिकारी अनिकेत घुले, तालुका अधिकारी विजय तिकोणे, शैला खंडागळे आदीसह पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी पुढे बोलताना अंबादास दानवे म्हणाले, ज्यांना गल्लीतील कुत्रं देखील विचारतं नव्हतं त्यांना शिवसेनेने मोठे केले. काल अब्दुल सत्तार म्हणाले मला कुत्रा चिन्ह दिलं तरी मी निवडून येईल असे सांगताना दानवे म्हणाले कुत्रा देखील प्रामाणिक असतो, तुम्ही गद्दार आहात. जनता तुम्हाला धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही. अडचणी च्या काळात जो शिवसेने सोबत तोच खरा शिवसैनिक अडचणी च्या काळात जो शिवसेने सोबत आहे तोच खरा शिवसैनिक असे कार्यकर्त्यांना सांगताना अंबादास दानवे म्हणाले, आपल्या नेतृत्वावर विश्वास ठेवा. पक्ष चिन्ह कोणाला मिळणार या विषयात तुम्ही पडू नका, बाळासाहेबांचे विचार व उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवा. शिवसेना कोणाची आहे हे जगाला माहिती आहे. शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांची आहे. त्यांनी माझ्या उद्धव व आदित्य यांना सांभाळा असे सांगितले आहे. त्यांच्या सोबत काम करा. शिवसेना चाळीस गद्दारांची नाही. कडवट शिवसैनिकांची आहे, भामटे, गद्दार, बंडखोर यांची नाही. कोर्टाचा निकाल येऊ द्या मंग बघू असे काही जण म्हणत आहे. पण काय व्हायचं ते होऊ दे आपण बाळासाहेबांच्या विचारांसोबत रहायचे. आपण होतो कोण मंग आपल्याला आजुन काय व्हायचं आहे. चिन्ह निशाणी या विषयात जाऊ नका. लोकांनी विचारले पाहिजे तुमची निशाणा कोणती आहे असे काम करा असा सल्ला दिला. संघटनेचे काम बुथ स्तरावर जाऊन करा संघटनेचे काम बुथ स्तरावर जाऊन करा, सरकार जेथे चुकेल तेथे रस्त्यावर उतरा. रस्त्यावर उतरुन संघर्ष करणारी शिवसेना आहे. पुर्वी तलवार घेऊन शिवसैनिक फिरत होते. आता शब्द हीच तलवार आहे. त्यावेळी परिस्थिती तशी होती. तेव्हा दगडांना शिवसेनाप्रमुखांनी घडविले आहे. आता लोकं म्हणात पुर्वीची शिवसेना राहिली नाही, मंग आता काय हातात तलवारी घेऊन ज्यांना घडविले त्यांच्यावर हातोडे घालायचे का ? आता संघर्ष आचार, विचारा ची तलावर घेऊन लढायचे आहे. मनात आत्मविश्वास ठेवा, तुम्ही जिंकू शकता हा संकल्प करा असे आवाहन अंबादास दानवे यांनी शिवसैनिकांना केले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...