Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

महापालिकेच्या पर्यावरण विभागाकडून पर्यावरणाचा र्‍हास?

पिंपरी : अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यात तत्पर असलेली पिंपरी चिंचवड महापालिका पर्यावरणविषयक नियम धाब्यावर बसवून कुदळवाडी येथे नाल्याचे पात्र बुजवून तेथे सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारत आहे. हे काम त्वरित थांबवावे अन्यथा या विरोधात तीव्र आंदोलन उभारले जाईल असा इशारा भारतीय मराठा महासंघातर्फे देण्यात आला आहे. महासंघाचे जिल्हा उपाध्यक्ष हृषिकेश कानवटे यांनी या संदर्भात प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हतले आहे की, पिंपरी चिंचवड महापालिकेच्या पर्यावरण विभागांकडून अनधिकृत बांधकाम चालू आहे. महापालिकेच्या पर्यावरण विभागातर्फे चिखली, कुदळवाडी येथे नाल्यावरच तीन एलएलडी क्षमतेच्या सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाचे काम सुरू आहे. या प्रकल्पासाठी तब्बल आठ कोटी रूपये खर्च होणार आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाने वारंवार महापालिकेला चिखली परिसरात सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार महापालिकेच्या पर्यावरण विभागातर्फे हे काम सुरू आहे. देहू आळंदी रस्त्यालगत कुदळवाडी परिसरात भला मोठा नाला आहे. या नाल्यातील पाणी थेट इंद्रायणी नदीत जात आहे. याच नाल्यावर महापालिकेने सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाचे काम सुरू केले आहे. कुदळवाडी येथील नाल्यावर चालू असलेले अनधिकृत बांधकाम त्वरीत थांबवावे अन्यथा येत्या 15 दिवसांत तीव्र आंदोलन करण्यात येईल.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...