आमदार महेश लांडगे यांना मातृशोक
9/25/2022 04:33:00 PM
0
भोसरी : भाजपचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष, आमदार महेश लांडगे यांच्या मातु:श्री हिराबाई किसनराव लांडगे यांचे शनिवारी अल्प आजाराने निधन झाले. त्या 65 वर्षांच्या होत्या. त्यांच्या पश्चात पति किसनराव लांडगे, मुले आमदार महेश लांडगे, कामगार नेता सचिन लांडगे आणि उद्योजक कार्तिक लांडगे, सुना, नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर रविवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास भोसरी येथीस तळ्याकाठी असलेल्या स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी विविध क्षेत्रातील पदाधिकारी,मान्यवर उपस्थित होते.

