Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

मालमत्ता हस्तांतरशुल्कातील वाढ रद्द करा : राहुल कलाटे

पिंपरी : महापालिकेने ३१ मार्च २०२२ नंतरच्या मालमत्ता हस्तांतर शुल्कात अर्धा टक्का वाढ केली आहे. ती कमी करून पूर्ववत करण्यात यावी अशी मागणी महापलिकेचे माजी शिवसेना गटनेते राहुल कलाटे यांनी केली आहे. याबाबत त्यांनी पालिका आयुक्त शेखर सिंह यांना निवेदन दिले आहे. त्यात म्हटले आहे की, महापालिकेने ३१ मार्च २०२२ नंतरच्या मालमत्ता हस्तांतर शुल्कात अर्धा टक्का वाढ केली आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांना मोठा आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. त्यामुळे या निर्णयाचा फेरविचार करून शहरातील नागरिकांना पूर्वीप्रमाणे करयोग्य मूल्याच्या ५ टक्क्याने आकारणी करून दिलासा देण्यात यावा, पूर्वी खरेदी विक्री द्वारे मालमत्ता हस्तांतरण करताना सुमारे २ हजार रुपयांपर्यंत कर भरावा लागत होता. परंतु ३१ मार्च २०२२ नंतर ही रक्कम जवळजवळ २० पटींनी वाढल्यामुळे ह्या निर्णयाचा फेरविचार करावा. तसेच काही नागरिकांनी ३१ मार्च पूर्वी व्यवहार करून देखील त्यांना फक्त आपल्याकडे अर्ज नाही केला म्हणून अर्धा टक्का रक्कम त्यांना जास्त भरावी लागत आहे. कोरोना काळ तसेच जेष्ठ नागरिक व त्यांची मुले परदेशात असल्यामुळे त्यांच्याकडून नजर चुकीने दुर्लक्ष झाल्या कारणाने त्यांना एवढे मोठ्या प्रमाणात आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. त्यामुळे लवकरात लवकर ही वाढ रद्द करण्यात यावी.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...