Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

आंबेडकरनगर झोपडपट्टी हटविली

पिंपरी : नेहरूनगर, पिंपरी येथील आंबेडकरनगर झोपडपट्टीवर शुक्रवारी सकाळी मोठा फौजफाटा घेऊन झोपडपट्टी पुनर्वसन विभाग (एस. आर. ए.), पुणे यांच्यावतीने कारवाई करण्यात आली. यावेळी काही नागरिकांनी कारवाईसाठी उपस्थित असलेले पोलिस व सुरक्षा कर्मचार्‍यांचे बळ पाहून आपणहून घरे खाली केली. तर, काहींनी कारवाईला विरोध करण्याचा प्रयत्न केला. या कारवाईपूर्वी गुरुवारी एस. आर. ए. च्या अधिकार्‍यांनी येथील रहिवाशांना निष्कासन कारवाईच्या नोटीसा दिल्या. त्यानुसार शुक्रवारी कारवाई सुरू करण्यात आली. या कारवाईत पोलीस आयुक्तालयाचे व राज्य राखीव पोलीस दलाचे अंदाजे 150 पोलीस अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते. एक अग्निशमन बंब, आठ ते दहा जेसीबी व आठ ते दहा छोटे आणि मोठे टेम्पो यांच्या सहाय्याने ही कारवाई करण्यात आली. तत्पूर्वी गुरुवारी रात्री झोपडपट्टीवासीयांनी पिंपरी पोलिसठाण्यात जाऊन या प्रकरणी न्यायालयात दावे सुरू असल्याने पोलिसांनी कारवाईत सहभागी होऊ नये असे पत्र पोलिसांना दिले.मात्र, पोलिस बंदोबस्तात कारवाई करण्यात आली.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...