Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

'नृत्यकथी' च्या संस्कृत आविष्काराला रसिकांची दाद!

भारतीय विद्या भवन,इन्फोसिस फाऊंडेशनचा सांस्कृतिक प्रसार कार्यक्रम पुणे ः भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाऊंडेशनच्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत ' नृत्यकथी' या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. नृत्यांजली डान्स अकॅडमी प्रस्तुत या कार्यक्रमात संस्कृत काव्य आणि कथांचा आविष्कार सादर करण्यात आला. या संस्कृत आविष्काराला रसिकांची चांगली दाद मिळाली. कार्यक्रमाची सुरुवात नांदी ने झाली. त्यानंतर दलात अडकलेल्या भ्रमराची स्थिती 'अलारिपू' या नृत्य सादरीकरणातून उलगडण्यात आली, त्यानंतर 'राजराजेश्वरी अष्टकम्' सादर झाले. मंत्रमुग्ध करणारी संक्षीप्त रामायण कथा नृत्यातून सादर करण्यात आली . नृत्यकथाविष्काराचे सादरीकरण झाले. वसंत ऋतु मधील आनंद , उत्साह , ग्रीष्म ऋतु मधील सुर्याची दाहकता, चंद्राची शीतलता आणि वर्षा ऋतुतील नवचैतन्य तिल्लाना या नृत्य सादरीकरणाने 'नृत्यकथी ' कार्यक्रमाची सांगता झाली. हा कार्यक्रम शनीवार, २४ सप्टेंबर २०२२ रोजी सायंकाळी सहा वाजता भारतीय विद्या भवनचे सरदार महादेव बळवंत नातू सभागृह,(सेनापती बापट रस्ता) येथे झाला.नृत्यकथी या कार्यक्रमाचे दिग्दर्शन संध्या धर्म आणि मिता पाठक यांनी केले होते. मिता पाठक,यशश्री जाधव,आर्या गिजरे,मैथिली दिवेकर,जान्हवी कशेळीकर,अवनी जवखेडकर,श्रावणी एंचवार,साक्षी पासकंटी,दर्शना पासकंटी हे नृत्यकलाकार सहभागी झाले होते. कृष्णा चतुर्भुज यांनी सूत्रसंचालन केले.हा कार्यक्रम विनामूल्य होता.‘भारतीय विद्या भवन’ आणि ‘इन्फोसिस फाऊंडेशन’च्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत सादर होणारा हा १४१ वा कार्यक्रम होता. भारतीय विद्या भवनचे मानद सचिव प्रा.नंदकुमार काकिर्डे यांनी सहभागी कलाकारांचा सत्कार केला.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...