Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

महाराष्ट्र गांधी स्मारक निधी तर्फे राष्ट्रपिता महात्मा गांधी सप्ताहाचे पुण्यात आयोजन

१ ऑक्टोबर रोजी सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते उदघाटन
पुणे :महाराष्ट्र गांधी स्मारक निधी तर्फे 'राष्ट्रपिता महात्मा गांधी सप्ताहा'चे पुण्यात १ ते ७ ऑक्टोबर २०२२ दरम्यान आयोजन करण्यात आले आहे. भजन, शांती मार्च, व्याख्याने, खादी वस्तूंचे प्रदर्शन असे कार्यक्रम या गांधी सप्ताहात होणार आहेत. गांधी सप्ताह आयोजनाचे हे ११ वे वर्ष आहे. महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे अध्यक्ष डॉ. कुमार सप्तर्षी आणि सचिव अन्वर राजन यांनी ही माहिती पत्रकाद्वारे दिली. शांती मार्च वगळता सर्व कार्यक्रम महाराष्ट्र गांधी स्मारक निधी ( गांधी भवन,कोथरुड ) येथे होणार आहेत. शनिवार,१ ऑक्टोबर रोजी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते सायंकाळी ६ वाजता सप्ताहाचे उदघाटन होणार आहे. सर्वधर्मप्रार्थनेने कार्यक्रमाची सुरुवात होईल. रविवार, २ ऑक्टोबर रोजी गांधी जयंती आणि जागतिक अहिंसा दिनाच्या निमित्ताने सकाळी ८ वाजता शुभांगी मुळे आणि सहकाऱ्यांचा प्रार्थना आणि भजनाचा कार्यकम होणार आहे. याच दिवशी लोकमान्य टिळक पुतळा (महात्मा फुले मंडई) ते सेनापती बापट पुतळा (अलका टॉकीज चौक) या मार्गावर दंगलमुक्त पुण्याचा संदेश घेऊन सकाळी साडेआठ वाजता 'शांती मार्च' काढण्यात येणार आहे. पुणे शहर कायम दंगामुक्त राहावे, या संकल्पासाठी हा शांती मार्च काढण्यात येणार आहे. गांधी जयंती निमित्त स.१० ते दु. ३ दरम्यान सर्वांकरीता प्रसाद भोजन आयोजित करण्यात आले आहे. लहान मुलांसाठी जादूगार संजय रघुवीर यांचे जादूचे प्रयोग दुपारी ४ वाजता होतील. सोमवार ३ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजता 'संसदीय लोकशाहीचे भवितव्य ' या विषयावर संविधान अभ्यासक डॉ उल्हास बापट यांचे व्याख्यान होणार आहे. ४ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजता ह.भ.प. शामसुंदर सोन्नर महाराज यांचे कीर्तन होणार आहे.गुरुवार,६ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजता पर्यावरणवादी कार्यकर्ते बंडू धोत्रे (चंद्रपूर) यांचे व्याख्यान होणार आहे. शुक्रवार,७ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजता ज्येष्ठ पत्रकार संजय आवटे (संपादक,लोकमत,पुणे ) यांच्या उपस्थितीत सप्ताहाचा समारोप कार्यक्रम होणार आहे. गांधी भवन आवारात खादी ,हातमाग आणि विविध गृहोपयोगी वस्तूंचे स्टॉल्सचे प्रदर्शन २४ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर दरम्यान सकाळी ११ ते रात्री ९ या वेळेत आयोजित करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...