Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

गुरुवारी संत तुकाराम साखर कारखान्याची वार्षिक सर्वसाधारण सभा

पिंपरी : कासारसाई-दारूंब्रे येथील श्री संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याची वार्षिक सर्वसाधारण सभा गुरूवार दि.29.9.2022 रोजी सकाळी 11.00 वाजता, श्री संत तुकाराम गार्डन मंगल कार्यालय, डांगेचौक, हिंजवडी रस्ता, जकातनाक्याशेजारी, वाकड, ता.मुळशी, जि.पुणे येथे कारखान्याचे अध्यक्ष नानासाहेब नवले यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. सर्व सभासदांनी सभेस उपस्थित रहावे असे आवाहन कारखान्याचे उपाध्यक्ष बापूसाहेब भेगडे यांनी केले आहे. या सभेमध्ये आर्थिक वर्ष 2021-22 या वर्षातील ताळेबंदपत्रक, नफातोटा पत्रक, ऑडिट मेमो सादर केले जाणार असून सभेच्या विषयपत्रकावर पुढील विषय मंंजुरीसाठी ठेवलेले आहेत. 1) मागील दि.29.9.2021 रोजीचे अधिमंडळ वार्षिक सर्वसाधारण सभेच्या कामकाजाचा वृत्तांत वाचून कायम करणे. 2) संस्थेच्या सन 2021-2022 वर्षासाठीच्या कामकाजा विषयीचा अहवाल, नफा-तोटा पत्रक व दि.31.3.2022 रोजीचा ताळेबंद स्वीकारणे व मंजूर करणे. 3) सन 2021-2022 वर्षात अंदाजपत्रकापेक्षा कमी जास्त झालेल्या भांडवली व महसुली जमाखर्चास मान्यता देणे. 4) सन 2023 2024 वर्षासाठी संचालक मंडळाने सादर केलेल्या भांडवली व महसुली अंदाजपत्रकाची नोंद घेऊन मान्यता देणे. 5) मा. वैधानिक लेखापरिक्षक सीए दिलीप फडणीस अ‍ॅण्ड कं., कोल्हापूर यांनी सन 2021-2022 आर्थिक वर्षाच्या दिलेल्या लेखापरिक्षण अहवालाची नोंद घेणे व सन 2020-2021 आर्थिक वर्षाचा लेखापरिक्षण दोष दुरूस्ती अहवाल स्वीकारणे. 6) सन 2022-2023 करिता शासनमान्य लेखापरिक्षकांच्या नामतालिकेमधून वैधानिक लेखापरिक्षक यांची नेमणूक करणे व लेखापरिक्षण शुल्क ठरविणे. 7) मा.कार्यकारी अभियंता, साखर आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचे मान्यतेनुसार केलेल्या स्थापत्य भांडवली कामाच्या खर्चास कार्योत्तर मान्यता देणे. 8) ऊस बिलातून कपात केलेल्या ठेवींची रक्कम परत करणेस मुदतवाढ देणे. 9) संस्थेच्या पोटनियम क्र.17 मधील तरतुदी नुसार सभेस अनुपस्थित असलेल्या सभासदांची गैरहजेरी क्षमापित करणेबाबत निर्णय घेणे. 10) मा. अध्यक्षांचे पूर्व परवानगीने ऐनवेळी येणार्‍या विषयांचा विचार विनीमय करणे. __कारखान्याचा येता गळीत हंगाम शासनाच्या धोरणानुसार सुरू होणार आहे. हंगाम चालू करण्याच्या दृष्टीने सर्व कामे पूर्ण झालेली आहेत अशी माहिती कार्यकारी संचालक एस.जी.पठारे यांनी दिली.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...