आंबेगाव : विद्यार्थ्यांना घेऊन जाणार्या बसला अपघात
9/27/2022 07:17:00 PM
0
पिंपरी : आंबेगाव, पुणे येथील एका खासगी शाळेच्या विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी बस खोल दरीत कोसळून झालेल्या अपघातात 44 विद्यार्थी जखमी झाले आहेत. जखमी विद्यार्थ्यांना घोडेगाव ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले असून चौघांना मंचर येथील रुग्णालयात नेण्यात आले आहे. आंबेगाव तालुक्यातील पिंपळगाव येथील मुक्ताई प्रशाला या शाळेचे विद्यार्थी आणि शिक्षक गिरवली येथील आयुका दुर्बीण पाहण्यासाठी गेले होते. या बसला अपघात झाला. ती दरीत कोसळली. अपघातग्रस्त बसमधील सर्वांना बसमधून बाहेर काढण्यात आले असून त्यांना नजिकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.