महापालिका नेमणार रखवालदारांसाठी 47 मदतनीस
9/30/2022 09:27:00 PM
0
पिंपरी : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या मालमत्ता, उद्याने आणि पाण्याच्या टाक्यांच्या सुरक्षेसाठी आणखी 47 कंत्राटी रखवालदार मदतनीसांची नियुक्ती करण्यात येणार आहे. त्यांना मूळ वेतन 11 हजार 500 आणि महागाई भत्ता 7 हजार 70 असे 18 हजार 570 मासिक वेतन दिले जाणार आहे. महापालिकेच्या मालमत्तांचे रक्षण करण्यासाठी असलेल्या रखवालदारांना मदतीसाठी एकूण 1 हजार 305 रमदतनीस कंत्राटी पद्धतीने नेमलेले आहेत.याचे ठेके एम. के. फॅसिलिटीज सर्व्हिसेस, नॅशनल सिक्युरिटी सर्व्हिसेस, सैनिक इंटेलिजन्स अॅण्ड सिक्युरिटी आणि क्रिस्टल इंटेग्रेटेड सर्व्हिसेस यांना देण्यात आले आहेत.ाअता आणखी 47 मदतनीस नेमले जाणार आहेत. सुरक्षा विभागाने तसा प्रस्ताव दिला होता. अ आणि फ क्षेत्रीय कार्यालयासाठी 3, ब आणि ग क्षेत्रीय कार्यालयासाठी 10, क आणि ई क्षेत्रीय कार्यालयासाठी 19 आणि ड आणि ह क्षेत्रीय कार्यालयासाठी 15 असे एकूण 47 रखवालदार मदतनीस नेमण्यात येणार आहेत.